R Ashwin World Record: रविचंद्रन अश्विनचा वर्ल्ड रेकॉर्ड, आधी बापाला आऊट केले आता...

R Ashwin World Record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना (IND vs WI 1st Test) डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे सुरु आहे.
R Ashwin
R AshwinDainik Gomantak
Published on
Updated on

R Ashwin World Record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना (IND vs WI 1st Test) डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन याने एक खास रेकॉर्ड नावावर केला.

भारताची पहिली गोलंदाजी

दरम्यान, दोन सामन्यांच्या मालिकेतील या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा (West Indies) कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी, हा सामना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन सायकलची सुरुवात आहे.

दरम्यान, ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने भारताला मोठे यश मिळवून दिले. या सामन्यात त्याने वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला.

R Ashwin
IND vs WI, 1st Test: ठरलं तर! जयस्वाल गिलच्या जागेवर रोहितबरोबर करणार ओपनिंग, तिसऱ्या क्रमांकावर...

इतिहास घडवला

36 वर्षीय अश्विनने वेस्ट इंडिजचा सलामीवीर तेगनारायण चंद्रपॉलला आपला बळी बनवले. चंद्रपॉलने 44 चेंडूत केवळ 12 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकही चौकार आला नाही आणि संघाच्या 31 धावांवर तो बाद झाला. यासह अश्विनने इतिहास रचला. कसोटीत पिता-पुत्र जोडीला बळी ठरवणारा अश्विन हा एकमेव भारतीय गोलंदाज ठरला आहे.

R Ashwin
IND vs WI, 1st Test: जयस्वालसोबतच 'या' स्टार खेळाडूचंही टीम इंडियाकडून पदार्पण! पाहा पहिल्या मॅचसाठीची Playing-11

2011 मध्ये शिवनारायण चंद्रपॉलला एलबीडब्ल्यू आऊट केले

दुसरीकडे, 2011 मध्ये दिल्लीत (Delhi) वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने शिवनारायण चंद्रपॉलला एलबीडब्ल्यू आऊट केले होते. आता अश्विनने शिवनारायण यांचा मुलगा तेगनारायण याला आऊट केले.

याआधी कधीच भारतीय गोलंदाजाने कसोटी फॉर्मेटमध्ये पिता-पुत्राला बळी बनवलेले नाही. त्यानंतर अश्विनने कर्णधार क्रेग ब्रॅथवेटला (20) रोहितकडे झेलबाद केले. अशाप्रकारे वेस्ट इंडिजच्या 2 विकेट 38 धावांवर पडल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com