CM Mamata Banerjee Twitter
क्रीडा

Sourav Ganguly: ''सौरव गांगुलीला ICC निवडणूक लढवण्याची परवानगी द्या'' ममता बॅनर्जींचे मोदींना आवाहन

सौरव गांगुलीला आयसीसी निवडणूक लढवण्याची परवानगी द्या असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीबाबत पंतप्रधान मोदींना खास आवाहन केले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या 'मी पंतप्रधानांना विनंती करतो की सौरव गांगुलीला आयसीसी निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी.' तो एक लोकप्रिय व्यक्ती आहे, म्हणून त्याला नाकारले जात आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, भारत सरकारला विनंती आहे की, राजकीय निर्णय घेऊ नका, तर क्रिकेट, खेळासाठी निर्णय घ्या. तो राजकीय पक्षाचा सदस्य नाही. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सौरव गांगुलीची भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदकडे (ICC) पाठवण्याचे आवाहन केले .

पुढे त्या म्हणाल्या सौरव गांगुलीला चुकीच्या पद्धतीने वेगळे केले गेले आहे. मी खूप दु:खी झाले आहे. सौरव खूप लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. तो भारतीय संघाचा कर्णधार होता. त्यांनी देशाला खूप काही दिले आहे. ते केवळ बंगालचाच नव्हे तर भारताचा अभिमान आहे. त्यांना अशा प्रकारे वगळणे चुकीचे आहे.

आयसीसी अध्यक्षपदासाठी 20 ऑक्टोबरला नामांकन दाखल केले जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला बोर्डाचे प्रमुख म्हणून कायम राहायचे होते, परंतु त्याला इतर सदस्यांकडून पाठिंबा मिळाला नाही. रॉजर बिन्नी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) निवर्तमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची जागा घेणार आहेत. सौरव गांगुली 2019 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष झाले. ते 18 ऑक्टोबर रोजी आपले पद सोडणार आहेत. बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडल्यानंतर सौरव गांगुलीने बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT