Cricket Facts: क्रिकेटच्या इतिहासातील या 3 रेकॉर्डबद्दल जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Unique Cricket Records: क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक आवडीचा खेळ आहे.
Cricket
CricketDainik Gomantak
Published on
Updated on

Unique Cricket Facts: क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक आवडीचा खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम झाले आणि मोडले गेले. पण आज आम्ही तुम्हाला अशा तीन विक्रमांबद्दल सांगत आहोत, ज्यांना चाहते अफवा मानतात, तुम्हालाही या रेकॉर्डबद्दल जाणून आश्चर्य वाटेल. चला तर मग अशा रेकॉर्ड्सबद्दल जाणून घेऊया...

एका दिवसात कसोटी सामन्याचे चार डाव

एक कसोटी सामना 5 दिवसांसाठी खेळला जातो, तर काहीवेळा तुम्ही कसोटी सामना 2 किंवा अगदी तीन दिवसात संपलेला पाहिला असेल. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एकाच दिवसात दोन्ही संघांनी चारही डाव खेळण्याचा अनोखा विक्रम 2000 साली इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाला.

Cricket
Asia Cup 2022: राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह, आशिया चषकापूर्वी भारताला मोठा धक्का

दरम्यान, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा पहिला डाव 267 धावांत गुंडाळला. यानंतर, त्याच दिवशी वेस्ट इंडिजने इंग्लंडला केवळ 134 धावांवर ऑलआउट केले आणि त्याच दिवशी वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 54 धावांवर आटोपला. यानंतर दुसऱ्या दिवशीच इंग्लंडचा दुसरा डाव सुरु झाला. दुसऱ्या दिवसाच्या डावात दोन्ही संघांनी आपापले दोन्ही डाव खेळून इतिहास रचला होता.

एक ओव्हर 17 चेंडूत पूर्ण केले

क्रिकेटच्या नियमांनुसार, गोलंदाज एका ओव्हरमध्ये 6 चेंडू टाकतो, परंतु एकदा गोलंदाजाने 17 चेंडूंचे ओव्हर टाकले. 2004 साली पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात ही घटना घडली होती. पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सामीने एका षटकात 17 चेंडू टाकले होते. आजही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठे षटक म्हणून त्याची नोंद आहे. या षटकात त्याने 4 नो बॉल आणि 7 वाईड बॉल टाकले आणि एकूण 22 धावा दिल्या, ज्यात दोन चौकारांचाही समावेश होता.

Cricket
Ind Vs Eng: टीम इंडियाच्या पराभवानंतर राहुल द्रविड म्हणाले...

द्रविडने षटकारांची हॅट्ट्रिक केली

भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) त्याच्या संथ फलंदाजीसाठी ओळखला जातो. चाहते त्याला षटकार मारण्यासाठी ओळखत नाहीत, परंतु द्रविडनेही सलग तीन षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. 2011 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात त्याने सलग तीन षटकार ठोकले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com