Umpire gave run out but Batsman continued Batting Dainik Gomantak
क्रीडा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Wanindu Hasaranga Sportsmanship Video: श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू आणि कॅन्डी रॉयल्सचा गोलंदाज वानिंदू हसारंगा याच्या एका निर्णयाची सध्या क्रिकेट जगतात तुफान चर्चा सुरु आहे.

Manish Jadhav

Wanindu Hasaranga Sportsmanship Video: लंका प्रीमियर लीग 2026 मधील 13व्या सामन्यात श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू आणि कॅन्डी रॉयल्सचा गोलंदाज वानिंदू हसारंगा याच्या एका निर्णयाची सध्या क्रिकेट (Cricket) जगतात तुफान चर्चा सुरु आहे. हसारंगाने दाखवलेल्या दिलदारपणाचे आणि 'स्पोर्ट्समनशिप'चे प्रचंड कौतुक तर होत आहे, मात्र त्याच्या या एकाच निर्णयामुळे त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. जाफना किंग्सविरुद्धच्या सामन्यात हसारंगाने प्रतिस्पर्धी फलंदाज अविष्का फर्नांडोला रनआऊट करुनही आपली अपील मागे घेतली आणि त्याला नवसंजीवनी दिली. हीच चूक कॅन्डी रॉयल्स संघाला महाग पडली.

सामन्यातील 7व्या ओव्हरमध्ये हसारंगा गोलंदाजी करत असताना कामिल मिशाराने मारलेला जोरदार शॉट नॉन-स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या अविष्का फर्नांडोला लागला. चेंडू फर्नांडोला लागून हसारंगाच्या हातात आला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता स्टंप उडवून फर्नांडोला रनआऊट केले. अंपायरनेही त्याला आऊट दिले कारण तो क्रीझच्या बाहेर होता. परंतु, चेंडू फलंदाजाला लागल्याने हसारंगाने औदार्य दाखवत आपली अपील मागे घेतली आणि फर्नांडोला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले.

त्यावेळी, फर्नांडो 46 धावांवर खेळत होता. जीवनदान मिळताच त्याने 36 चेंडूंत 66 धावांची फटकेबाजी केली आणि कामिल मिशारासोबत (78 धावा) तब्बल 129 धावांची वादळी भागीदारी रचली. या मोठ्या भागीदारीच्या जोरावर जाफना किंग्सने 20 षटकांत 199 धावांचा डोंगरावढा डोंगर उभा केला.

200 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना कॅन्डी रॉयल्सचा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. संपूर्ण संघ 18.2 षटकांत अवघ्या 106 धावांवर ऑलआऊट झाला आणि त्यांना 99 धावांनी लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. कॅन्डीकडून केवळ लाहिरु उडारा याने 54 धावांची लढाऊ खेळी खेळली, तर शाहीन शाह आफ्रिदीने 22 धावांचे योगदान दिले. जाफना किंग्सकडून मोहम्मद शिराज आणि दुनिथ वेलालागे यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेत कॅन्डीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT