Team India: गौतम गंभीरला 'इग्नोर' करत आहेत सीनियर खेळाडू? ड्रेसिंग रूममध्ये धुसफूस, 'BCCI'पर्यंत पोहोचली नाराजी

Gautam Gambhir dressing room rift: टी-२० विश्वचषक २०२६ मधील दिमाखदार विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ आता २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे.
Team India Controversy
Team India ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

टी-२० विश्वचषक २०२६ मधील दिमाखदार विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ आता २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेच्या पार्श्वभूमीवर ड्रेसिंग रूममधील वातावरणाबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि काही सीनियर खेळाडू यांच्यात ताळमेळाचा अभाव दिसून येत असून, ड्रेसिंग रूममध्ये काहीशी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

खेळाडू थेट बीसीसीआयच्या संपर्कात?

मिळालेल्या माहितीनुसार, सीनियर खेळाडू आता आपल्या भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी हेड कोच गौतम गंभीर यांच्याकडे जाण्याऐवजी थेट बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत.

ही बाब केवळ गंभीर यांच्यासाठीच नाही, तर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि वनडे कर्णधार शुभमन गिल यांच्यासाठीही डोकेदुखी ठरत आहे. संघात अनेक अनुभवी खेळाडू असताना त्यांना सांभाळणे आणि प्रत्येकाला त्यांची भूमिका स्पष्ट करणे हे गिल आणि गंभीर यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

Team India Controversy
Goa Education: गोव्याचा स्थानिक वारसा आता अभ्यासक्रमात, NEP-अनुरूप पाठ्यपुस्तकांची सर्व वर्गांत अंमलबजावणी

नियोजनाचा अभाव की संवादहीनता?

बीसीसीआयच्या एका अंतर्गत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, टी-२० आणि कसोटी फॉरमॅटच्या तुलनेत वनडे मालिकेसाठी गंभीर यांनी तितक्या आक्रमकपणे नियोजन केलेले नाही. याउलट, त्यांनी परिस्थिती जशी येईल तशी हाताळण्याचे धोरण स्वीकारले आहे.

मात्र, आता वनडे वर्ल्ड कपसाठी उर्वरित १६ महिन्यांचा कालावधी हातात असल्याने, गंभीर आणि गिल यांना अधिक आक्रमक होऊन खेळाडूंना विश्वासात घ्यावे लागणार आहे. ड्रेसिंग रूममधील ही 'कोल्ड वॉर' जर लवकर निवळली नाही, तर त्याचा फटका आगामी महत्त्वाच्या मालिकांना बसू शकतो.

Team India Controversy
Goa Congress: विधानसभेसाठी काँग्रेस- गोवा फॉरवर्ड युती आवश्यक- दत्ता नायक

अफगाणिस्तान मालिकेपासून नव्या प्रवासाला सुरुवात

येत्या १३ जूनपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. २०२७ च्या विश्वचषकाचे मिशन फत्ते करण्यासाठी बीसीसीआयने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली आहे.

या मालिकेतून सर्वोत्तम संघ निवडण्याचे आणि खेळाडूंच्या भूमिका निश्चित करण्याचे कठीण काम आता टीम मॅनेजमेंटला करावे लागणार आहे. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की, गंभीर आणि गिल या आंतरिक मतभेदांना बाजूला सारून संघाला पुन्हा एकदा एकासूत्रात कसे बांधतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com