Virat Kohli| Cristiano Ronaldo| Yuvraj Singh  DAINIK GOMANTAK
क्रीडा

'Virat Kohli स्वत:ला रोनाल्डा समजतो, पण...' धोनीनंतर आता युवराजचा कोहलीबाबत खुलासा

Yuvraj Singh ने एका मुलाखतीत सांगितले की, माझ्या आणि विराटमध्ये फुटबॉलमध्ये मोठी लढत झाली होती. आशिष नेहरा आणि वीरेंद्र सेहवागसोबतही मी फुटबॉलवरुन भांडलो आहे.''

Ashutosh Masgaunde

Virat Kohli Thinks He Is Cristiano Ronaldo Says Yuvraj Singh In A Podcast:

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग अलीकडच्या काळात आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबतच्या मैत्रीबाबत दिलेल्या वक्तव्यानंतर आता त्याने विराट कोहलीबाबत मोठा खुलासा केला आहे.

युवराजने कोहलीची मजा घेत म्हटले की, "तो स्वत:ला ख्रिस्तियानो रोनाल्डो समजतो, पण तो तसा नाही."

युवराज आणि कोहली दोघेही भारतासाठी एकत्र खेळले आहेत. दोघेही आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघात काही हंगामात एकत्र होते.

युवराजने 2019 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला निरोप दिला, तर कोहली सध्या भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे.

प्रसिद्ध क्रिकेटपटू असण्यासोबतच हे दोघेही चांगले फुटबॉलपटू आहेत आणि युवराज या खेळात तो कोहलीपेक्षा सरस असल्याचे मानतो.

युवराजने एका मुलाखतीत सांगितले की, माझ्या आणि विराटमध्ये फुटबॉलमध्ये मोठी लढत झाली होती. आशिष नेहरा आणि वीरेंद्र सेहवागसोबतही मी फुटबॉलवरुन भांडलो आहे.''

युवराजला कोहली सर्वोत्तम फुटबॉल आहे का, असे विचारले असता तो म्हणाला, ''विराटला असे वाटते. त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु माझ्याकडे त्याच्यापेक्षा अधिक क्षमता आहे. तो एक महान फलंदाज आहे आणि मी एक चांगला फुटबॉलपटू आहे. विराटला तो ख्रिस्तियानो रोनाल्डो असल्यासारखे वाटतो, पण तो नाही. मात्र, तो क्रिकेटचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे."

याच मुलाखतीत युवराजने कोहलीसोबतचे त्याचे नाते उघड केले. युवराज अशा काही भारतीय खेळाडूंपैकी एक होता ज्याने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात कोहलीला खूप मोकळेपणाने सांभाळून घेतले होते.

दोन्ही खेळाडूंचे एकमेकांशी एकदम घट्ट नाते आहे. अनेकदा ते सोशल मीडियाद्वारे एकमेकांची मजा घेत असतात.

मात्र, युवराजने खुलासा केला की, तो कोहली खूप व्यस्त असल्याने त्याला त्रास देत नाही. “मी त्याला त्रास देत नाही कारण तो सध्या खूप व्यस्त आहे.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT