Virat Kohli: 'माझ्या हिरोच्या रेकॉर्डची...', सचिनच्या 49 शतकांची बरोबरी केल्यावर विराट भावूक

Virat Kohli on 49th Century: विराट कोहलीने वनडेत 49 वे शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी केल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Sachin Tendulkar - Virat Kohli
Sachin Tendulkar - Virat KohliBCCI/ICC
Published on
Updated on

Virat Kohli Opened Up on equaling Sachin Tendulkar's 49 ODI Centuries record:

रविवारी (5 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला 243 धावांनी पराभूत केले. कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताकडून स्टार फलंदाज विराट कोहलीने शतकी खेळी केली. याबरोबरच त्याने सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली.

विराटने या सामन्यात 121 चेंडूत 10 चौकारांसह 101 धावांची नाबाद खेळी केली. विराटचे हे वनडे कारकिर्दीतील 49 वे वनडे शतक आहे. त्यामुळे विराटने सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 वनडे शतकांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे रविवारी विराट त्याचा 35 वा वाढदिवसही साजरा करत होता.

विराटने हे शतक ठोकल्यानंतर सचिननेही सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचे अभिनंदन केले होते, तसेच त्याने लवकरच 50 वे शतक करत त्याचा विक्रमही मोडावा अशी आशाही व्यक्त केली होती. याबद्दल विराटने सामन्यानंतर प्रतिक्रियाही दिली.

Sachin Tendulkar - Virat Kohli
Virat Kohli: 'ईश्वराचा आभारी की...' वाढदिवशी 49 वे शतक केल्यावर विराटने दिली पहिली प्रतिक्रिया

रविवारी झालेल्या सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केल्याबद्दल विराट म्हणाला, 'माझ्यासाठी हे खूप आहे. माझ्या हिरोच्या विक्रमाची बरोबरी करणे माझ्यासाठी खूपच खास आहे.'

'फलंदाजीच्या बाबतीत तो परिपूर्ण आहे. माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण आहे. मला माहित आहे मी कुठून आलो आहे, मला आठवते मी टीव्हीवर त्याला खेळताना पाहायचो. त्यामुळे त्याच्याकडून कौतुक होणे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.'

दरम्यान, विराटने याबरोबरच त्याच्या खेळीबद्दल म्हटले की हे शतक वाढदिवशी झाल्यानेही खास आहे.

Sachin Tendulkar - Virat Kohli
HBD Virat Kohli: विराट कोहलीचा प्रवास म्हणजे दिल्ली का छोरा ते क्रिकेटचा 'किंग'

भारताचा विजय

या सामन्यात विराट व्यतिरिक्त श्रेयस अय्यरनेही शानदार खेळी केली. विराट आणि श्रेयस यांच्यात महत्त्वपूर्ण १३४ धावांची भागीदारीही झाली. श्रेयसने 87 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावांची खेळी केली.

त्याचबरोबर रोहित शर्माने 24 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 40 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाग 326 धावांचा टप्पा गाठला.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी, मार्को यान्सिन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि ताब्राईज शम्सी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 327 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 27.1 षटकात सर्वबाद 83 धावाच करता आल्या. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com