T20 World Cup 2007 फायनलमध्ये धोनीला जोगिंदरकडे गोलंदाजी देण्याचा सल्ला कोणी दिला? युवीचा गौप्यस्फोट

T20 World Cup 2007: टी20 वर्ल्डकप 2007 च्या फायनलमध्ये शेवटच्या षटकात जोगिंदरला गोलंदाजी देण्याचा निर्णय एकट्या धोनीचा नव्हता, याबद्दल युवराजने खुलासा केला आहे.
Team India | 2007 T20 World Cup
Team India | 2007 T20 World CupICC
Published on
Updated on

Yuvraj Singh Revealed Harbhajan Singh advice MS Dhoni to gave last over to Joginder Sharma in the 2007 T20 World Cup final:

भारतीय क्रिकेट संघाने 2007 साली झालेल्या पहिल्या टी20 वर्ल्डकपचे विजेतेपद जिंकले होते. त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद एमएस धोनीकडे होते. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत करत हे विजेतेपद जिंकले होते. याच अंतिम सामन्याबद्दल युवराज सिंगने एक आठवण सांगितली आहे.

अंतिम सामन्यात पाकिस्तानला अखेरच्या षटकात 13 धावांची गरज होती. त्यावेळी चांगल्या फॉर्ममध्ये असलेला मिस्बाह उल हक नाबाद होता. पण कर्णधार धोनीने जोगिंदर शर्माकडे शेवटच्या षटकात चेंडू सोपवला आणि जोगिंदरनेही आपले काम चोख करत मिस्बाहला बाद करून भारताला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Team India | 2007 T20 World Cup
World Cup 2023: फलंदाजांसाठी भारतातील 'हे' मैदान बनले स्वर्ग, विश्वचषकाच्या इतिहासात झळकली सर्वाधिक शतके

दरम्यान, नुकतेच युवराजने सांगितले की जोगिंदरकडे गोलंदाजी देण्याचा सल्ला हरभजन सिंगने धोनीला दिला होता. अखेरच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी धोनीकडे हरभजन आणि जोगिंदर या दोघांचेच पर्याय होते.

रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सकारात्मक दृष्टीकोनातून युवराजने सांगितले की 'खरंतर तेव्हा असा निर्णय झालेला की भज्जी अखेरच्या षटकात गोलंदाजी करेल, धोनी त्याच्याकडे गेला आणि त्याने सांगितले तुझ्याकडे अनुभव आहे, तू गोलंदाजी कर. पण भज्जी म्हणाला, मी मिस्बाहला एका षटकात गोलंदाजी केली आहे आणि त्याने मला 3 षटकार मारलेत, त्यामुळे जोगिंदरला सांग.' हरभजनने त्याला ही कल्पना दिली होती.'

Team India | 2007 T20 World Cup
Yuvraj Singh: 'अखेर 23 वर्षांपूर्वीची परतफेड झालीच...', भारताने श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर युवीचं ट्वीट चर्चेत

दरम्यान, अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर 158 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने 19 षटकात 9 बाद 145 धावा केल्या होत्या.

मात्र, अखेरच्या षटकात जोगिंदरने पहिल्या चेंडूवर एक धाव दिली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मिस्बाहने षटकार ठोकला. मात्र, तिसऱ्याच चेंडूवर मिस्बाहचा झेल 43 धावांवर एस श्रीसंतने पकडला. त्यामुळे पाकिस्तानचा संघ 19.3 षटकात 152 धावांवर सर्वबाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com