Virat Kohli - Rutuaj Gaikwad X
क्रीडा

SA vs IND, Test: विराट परतला भारतात, तर ऋतुराज कसोटी मालिकेतून बाहेर? मोठी अपडेट आली समोर

Virat Kohli - Ruturaj Gaikwad: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋतुराज गायकवाडच्या खेळण्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

Pranali Kodre

South Africa vs India Test Series, Virat Kohli - Ruturaj Gaikwad:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 आणि वनडे मालिकेत भारताने विजय मिळवले. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून चालू होणार आहे. दरम्यान, या मालिकेपूर्वी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा मुंबईला रवाना झाला आहे, तर ऋतुराज गायकवाड कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार विराट काही दिवसांपूर्वीच कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत पोहचला होता. मात्र तीन दिवसांपूर्वी त्याला कुटुंबात इमर्जन्सी आल्यामुळे तो पुन्हा भारतात परतला आहे. पण कसोटी मालिकेपूर्वी तो पुन्हा भारतीय संघात सामील होणार आहे.

दरम्यान, भारतात पुन्हा परतल्याने विराटला भारतीय संघाच्या तीन दिवसीय सराव सामन्यात सहभागी होता आलेले नाही. तो आता 22 डिसेंबर रोजी पुन्हा जोहान्सबर्गला परत येणार असल्याची शक्यता आहे. तथापि, त्याला कोणती इमर्जन्सी होती, याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

तसेच बीसीसीआयच्या सुत्राने क्रिकबझला दिलेल्या माहितीनुसार ऋतुराज गायकवाड त्याच्या अनामिकेला (करंगळी शेजारील बोट) झालेल्या दुखापतीमुळे आगामी कसोटी मालिकेतून बाहेर झाला आङे. त्याला भारतीय संघ व्यवस्थापनाने मुक्त केले आहे.

26 वर्षीय गायकवाडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे ऋतुराजला तिसऱ्या वनडे सामन्यात खेळता आले नव्हते. दरम्यान तो कसोटी मालिकेतून बाहेर पडल्याची अधिकृत माहिती अद्याप बीसीसीआयने दिलेली नाही.

विराट-रोहित वर्ल्डकप 2023 नंतर पहिल्यांदाच खेळणार

कसोटी मालिकेतून विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा भारतीय संघात पुनरागमन करताना दिसणार आहेत. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर या खेळाडूंनी विश्रांती घेतली होती. आता हे खेळाडू कसोटी मालिकेत खेळताना दिसू शकतात.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी मालिका

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेचा पहिला सामना सेंच्युरियनला 26 ते 30 डिसेंबर 2023 दरम्यान होणार आहे. तसेच दुसरा सामना 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान केपटाऊनला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT