Virat Kohli 73rd Century Celebration
Virat Kohli 73rd Century Celebration  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: जिंकलंस रे भावा! 73 वे शतक ठोकताच विराटचं नव्या वर्षात 'ग्रँड सेलिब्रेशन', Video व्हायरल

Pranali Kodre

Virat Kohli: भारत विरुद्ध श्रीलंका संघात सध्या वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने शतकी खेळी केली.

विराटने 80 चेंडूत शतकाला गवसणी घातली होती. त्याने हे शतक करताच जोरदार सेलिब्रेशनही केले. त्याने सेलिब्रेशन करताना मैदानावर उंच उडी मारत त्याचा आनंद व्यक्त केला. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

(Virat Kohli Celebration after 73rd International Century)

विराटने या सामन्यांत 87 चेंडूत 113 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 73 वे शतक ठरले, तर वनडे क्रिकेटमधील त्याचे हे 45 वे शतक ठरले आहे.

विराटने ही त्याची शतकी खेळी करताना केएल राहुलबरोबर चौथ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारीही केली. याबरोबरच त्याने रोहित शर्माबरोबर 30 आणि श्रेयस अय्यरबरोबर 40 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या देखील केल्या.

या सामन्यात विराट व्यतिरिक्त रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनीही चांगला खेळ केला. या दोघांनी सलामीला फलंदाजी करताना भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यांनी सलामीलाच 143 धावांची भागीदारी केली होती.

रोहित आणि शुभमन या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली. रोहितने 67 चेंडूत 83 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच शुभमनने 60 चेंडूत 11 चौकारांसह 70 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाने 50 षटकांत 373 धावा धावफलकावर लावल्या. श्रीलंकेकडून कसून रजिताने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT