Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Virat Kohli Last ODI World Cup 2027: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात उद्यापासून (27 सप्टेंबर) तीन सामन्यांची रोमांचक एकदिवसीय मालिका सुरु होत आहे.

Manish Jadhav

Virat Kohli Last ODI World Cup 2027: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात उद्यापासून (27 सप्टेंबर) तीन सामन्यांची रोमांचक एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. या मालिकेसाठी सर्व खेळाडू कसून सराव करत आहेत. विशेष म्हणजे, इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत असून, त्याला पुन्हा एकदा अ‍ॅक्शनमध्ये पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. दरम्यान, या महत्त्वाच्या मालिकेच्या पूर्वसंध्येला स्टार फलंदाज विराट कोहलीने एक मोठी घोषणा केली.

त्याने स्पष्ट केले की, आगामी एकदिवसीय विश्वचषक हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटची आयसीसी स्पर्धा असेल आणि भारताला विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी मैदानात तो आपली पूर्ण ताकद पणाला लावेल.

जिओ हॉटस्टारवर एका कार्यक्रमादरम्यान बोलताना विराटने टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आणि संघातील तरुण खेळाडूंबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपण पूर्णपणे उपलब्ध असणार असल्याचे सांगत विराटने म्हटले की, 'माझ्यासाठी देशाचे प्रतिनिधित्व करणारा हा अखेरचा वर्ल्ड कप असणार आहे आणि हीच गोष्ट माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मला कोणत्याही परिस्थितीत भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे आणि त्यासाठी जे काही करावे लागेल, ते मी सर्वकाही करेन.' कोहलीचा हा पाचवा एकदिवसीय विश्वचषक असेल आणि त्याने आपल्या कारकिर्दीत यापूर्वी दोन विश्वचषक फायनल सामने खेळले आहेत.

यावेळी विराटने कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाचे भरभरुन कौतुक केले. गिलच्या नेतृत्वाबद्दल बोलताना कोहली म्हणाला की, गिल अजून या भूमिकेत नवीन असून तो हळूहळू नेतृत्व करणे शिकत आहे. परंतु, त्याच्याकडे टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य दृष्टिकोन आणि प्रखर जिद्द आहे. मैदानावर त्याची रणनीती अगदी स्पष्ट असते. येत्या काळात तो भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेईल. तो दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करेल यात शंका नाही, कारण मैदानावर नेहमी काहीतरी वेगळे आणि नाविन्यपूर्ण करण्याचा त्याचा विचार असतो, जो त्याला इतर खेळाडूपेक्षा खूप खास बनवतो.

एकदिवसीय विश्वचषकात विराट कोहलीची (Virat Kohli) कामगिरी नेहमीच ऐतिहासिक आणि रेकॉर्डब्रेक राहिली आहे. वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 37 डावांमध्ये 1795 धावा केल्या असून, यात 5 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत महान खेळाडू सचिन तेंडुलकर 44 डावांत 2278 धावांसह अव्वल स्थानी आहे. आगामी वर्ल्ड कपमध्ये विराट 2000 धावांचा टप्पा पार करुन नवीन विक्रम प्रस्थापित करु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT