Sachin vs Virat: "सचिनपेक्षा विराटच श्रेष्ठ!" दिग्गज क्रिकेटपटूच्या दाव्याने क्रिकेट जगतात खळबळ

AB de Villiers On Sachin vs Virat: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने आपल्या युट्यूब चॅनेलवर एक वक्तव्य करुन क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली.
Sachin Tendulkar and Virat Kohli cricket comparison
Sachin Tendulkar vs Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

AB de Villiers On Sachin vs Virat: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने आपल्या युट्यूब चॅनेलवर एक वक्तव्य करुन क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली. कसोटी क्रिकेटमध्ये भारताला परदेशी भूमीवर यश मिळवून देण्यात विराट कोहलीचा वाटा सचिन तेंडुलकरपेक्षाही मोठा आणि प्रभावी राहिला, असे वक्तव्य डिव्हिलियर्सने केले.

डिव्हिलियर्सच्या मते, सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) परदेशात जाऊन कसे खेळायचे आणि विजय मिळवायचा या परंपरेची सुरुवात नक्कीच केली. मात्र, विराटने या परंपरेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. सचिनच्या तुलनेत विराट अधिक आक्रमक आणि कणखर फलंदाज सिद्ध झाला. विराटाच्या याच दृष्टिकोनामुळे आज के. एल. राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांसारखे अनेक नवोदित फलंदाज परदेशी खेळपट्ट्यांवर आत्मविश्वासाने खेळताना दिसत आहेत.

Sachin Tendulkar and Virat Kohli cricket comparison
Virat Kohli Test Comeback: टेस्ट क्रिकेटमध्ये परतणार की नाही? विराट कोहलीच्या एका वक्तव्यानं सर्व चर्चांना पूर्णविराम Watch Video

याशिवाय, के. एल. राहुलच्या कामगिरीवर भाष्य करताना डिव्हिलियर्स म्हणाला की, राहुलकडे स्कील उत्तम असले तरी परदेशी भूमीवर त्याची सरासरी केवळ 34 ची आहे. जर राहुलला संघात आपले स्थान अधिक मजबूत करायचे असेल, तर त्याला मैदानात सेट झाल्यावर मोठ्या धावा कराव्या लागतील आणि शतकांचे रुपांतर मोठ्या धावसंख्येत करावे लागेल.

Sachin Tendulkar and Virat Kohli cricket comparison
Virat Kohli Lizlaz Controversy: "विराटची बदनामी करण्यासाठी मला पैशांचं आमिष दाखवलं" जर्मन मॉडेलचा खळबळजनक खुलासा

सचिन तेंडुलकर विरुद्ध विराट कोहली: आकडेवारी काय सांगते?

आकडेवारीचा विचार केला तर सचिन तेंडुलकरचे पारडे आजही खूप जड आहे:

  • सचिन तेंडुलकर: 200 कसोटी सामने- 15,921 धावा. यापैकी परदेशी भूमीवर 8,705 धावा.

  • विराट कोहली: 123 कसोटी सामने- 9,230 धावा. यापैकी परदेशात 66 सामन्यांमध्ये 4,774 धावा केल्या आहेत.

Sachin Tendulkar and Virat Kohli cricket comparison
Virat Kohli: 'किंग कोहली'चा धमाका! विश्वविक्रमापासून विराट आहे फक्त 'इतक्या' धावा दूर; दिग्गजांचे रेकॉर्ड धोक्यात

आकडेवारी स्पष्ट दर्शवते की, परदेशी खेळपट्ट्यांवर सचिन तेंडुलकरचा दबदबा आणि कामगिरी अधिक मजबूत राहिली, तरीही डिव्हिलियर्सने विराटच्या आक्रमक आणि प्रभावी शैलीला पसंती दर्शवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com