Virat Kohli new project in Goa for Football Dainik Gomantak
क्रीडा

Goa Football: विराटकडून गोव्यात नव्या प्रोजेक्टची घोषणा, FC Goa सह करणार 'हे' काम

विराट कोहलीने एफसी गोवा फ्रँचायझीसह गोव्यातील नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Virat Kohli new project in Goa for Football: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली फुटबॉलचाही मोठा चाहता आहे, हे कोणापासून लपलेले नाही. तो अनेकदा फुटबॉलही खेळताना दिसतो. तसेच पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याचा आवडता खेळाडूही आहे. आता विराट तळागाळात फुटबॉलला प्रोस्ताहन देण्यासाठीही पुढे आला आहे.

विराट हा इंडियन सुपर लीगमधील एफसी गोवा संघाचा सहसंघमालक आहे. त्यामुळे आता तो या संघासह युवकांमध्ये फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी मोठी योजना घेऊन आला आहे. त्याने याबद्दल ट्वीटरवर घोषणा केली आहे. त्याने 'तळागाळातील फुटबॉल क्रांतीसाठी सज्ज व्हा', असे म्हणत चाहत्यांबरोबर माहिती शेअर केली आहे.

विराटने ट्वीटरवर माहिती दिली आहे की एफसी गोवा आणि फोर्सा गोवा फाऊंडेशनने युवकांमध्ये फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी गोव्यात ‘फील्ड्स ऑफ ड्रीम प्रोजेक्ट’ सुरू केला आहे. याशिवाय विराटने त्याच्या ट्वीटमध्ये अशीही माहिती दिली की गोवा राज्यात तीन नवीन फुटबॉल मैदाने बांधण्याची त्यांची योजना आहे.

भारतात सर्वाधिक फुटबॉल खेळला जाणाऱ्या आणि लोकप्रिय असलेल्या ठिकाणांपैकी गोवा हे एक राज्य आहे. दरम्यान, यंदा इंडियन सुपर लीग स्पर्धेचा अंतिम सामना देखील गोव्यात होणार आहे. 18 मार्च रोजी गोव्यातील फातोर्डा येथील पंडीत जवाहरलाल नेहरु या मैदानावर हा अंतिम सामना होणार आहे.

दरम्यान, दरम्यान, सध्याच्या इंडियन सुपर लीगमध्ये मुंबई सिटी एफसी, हैदराबाद एफसी, एटीके मोहन बागान, बेंगळुरू एफसी आणि केरळ ब्लास्टर्स एफसी या पाच संघांनी प्लेऑफमधील जागा पक्की केली आहे. मात्र आता प्लेऑफमधील अखेरच्या स्थानासाठी ओडिशा एफसी आणि एफसी गोवा यांच्यात स्पर्धा आहे.

या दोन्ही संघांचे अखेरचे साखळी फेरीतील सामने बाकी आहेत. 22 मार्च रोजी एफसी गोवाला बंगळुरू एफसीविरुद्ध सामना खेळायचा आहे. तसेच ओडिशा एफसीला जमशेदपूर एफसी विरुद्ध सामना खेळायचा आहे. सध्या गुणतालिकेत प्रत्येक 19 सामन्यांनंतर ओडिशा एफसी 30 गुणांसह 6 व्या आणि एफसी गोवा 27 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे एफसी गोवासाठी प्लेऑफला पात्र ठरण्यासाठी बंगळुरुविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे.

तसेच विराटबद्दल सांगायचे झाल्यास विराट सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय अद्याप निश्चित झालेले नाही: मुख्यमंत्री

Goa Crime: रशियन महिलेने केली गांज्याची शेती, जामीनावर बाहेर, रशियातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणीत सहभागी

Mapusa: बार्देश प्रशासकीय संकुलाची दुर्दशा! नाक मुठीत धरून करावी लागते ये-जा; पार्किंगची समस्याही जटील

Weekly Horoscope: आर्थिक बाबतीत सावधगिरी, करिअरमध्ये प्रगती; जाणून घ्या तुमच्या राशीचा आठवडा कसा असेल?

Morjim: वाळूचे तेंब उद्ध्वस्त करून पार्किंग प्रकल्प नकोच! नागरिकांचा इशारा; पंचायत, आमदाराचा प्रकल्पाला पाठिंबा

SCROLL FOR NEXT