ISL Final In Goa: हिरो इंडियन सुपर लीगसाठी गोव्यातील मैदानाची निवड; फातोर्डा येथे रंगणार अंतिम सामना

हिरो आयएसएलचे प्लेऑफ सामने 3 मार्चपासून सुरू होणार
ISL Football Team Trophy | ISL Final In Goa
ISL Football Team Trophy | ISL Final In GoaDainik Gomantak

Indian Super League Final 2022-23 To Be Heald In Goa: हिरो इंडियन सुपर लीगने अंतिम सामन्यासाठी गोव्याची निवड केली आहे. याबाबतची घोषणा हिरो आयएसएलने आज केली.

गोव्यातील फातोर्डा येथील पंडीत जवाहरलाल नेहरु या मैदानावर हा अंतिम सामना होणार आहे. हिरो आयएसएलचे प्लेऑफ सामने 3 मार्चपासून सुरू होणार आहेत.

ISL Football Team Trophy | ISL Final In Goa
PM Gati Shakti : वेर्णा औद्योगिक वसाहतींचा कायापालट होणार

हिरो आयएसएलचा 2022-23 मोसम रोमांचक ठरला असून प्लेऑफसाठी अनेक संघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. हिरो आयएसएल प्लेऑफचे सामने 3 मार्चपासून सुरू होतील आणि अंतिम सामना 18 मार्च रोजी खेळला जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी उपलब्ध मैदान व पायाभूत सुविधांमुळे गोव्यातील मैदानाची निवड करण्यात आली आहे. मुंबई सिटी एफसीने लीग शिल्ड जिंकली आहे.

हैदराबाद एफसी, एटीके मोहन बागान, बेंगळुरू एफसी आणि केरळ ब्लास्टर्स एफसी आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर ओडिशा एफसी आणि एफसी गोवा यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे कारण संघ लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात पोहोचले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com