ISL 2022-23: मुंबई सिटी घरच्या मैदानावर उचलणार लीग शिल्ड, लोकल बॉय राहुल भेके म्हणतोय...

मुंबई सिटी रविवारी अखेरची लीग मॅच खेळणार असून त्यापूर्वी लोकल बॉय राहुल भेकेने लीग शिल्ड विजय ते ग्रेग स्टीवर्टची दुखापत, अशा विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे.
Rahul Bheke
Rahul BhekeDainik Gomantak

ISL 2022-23: इंडियन सुपर लीग 2022-23 हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असून मुंबई सिटी एफसी संघ त्यांच्या अखेरचा साखळी फेरीतील सामना ईस्ट बंगाल एफसीविरुद्ध 19 फेब्रुवारी रोजी खेळणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईचा अनुभवी डिफेंडर राहुल भेकेने विविध विषयांवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईने यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत फक्त एक पराभव स्विकारला आहे. हा पराभव त्यांना त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी खेळलेल्या बंगळुरू एफसीविरुद्ध स्विकारावा लागला. दरम्यान असे असले तरी मुंबईने गुणतालिकेतील पहिले स्थान कायम ठेवले आहे. खरंतर 11 फेब्रुवारी रोजी एफसी गोवा विरुद्ध झालेल्या सामन्यानंतरच मुंबईने अव्वल स्थानावर आपला हक्क सांगितले होता.

त्याचमुळे यंदा लीग शिल्ड मुंबई सिटीच उचलणार हे निश्चित झाले होते. आता मुंबई अखेरचा साखळी सामना घरच्या मैदानावर 19 फेब्रुवारीला खेळणार असल्याने त्यांना घरच्या चाहत्यांसमोर लीग शिल्ड उचलण्याची संधी असणार आहे.

Rahul Bheke
ISL Football : ISLच्या प्ले-ऑफ फेरीचे स्वरुप बदलले; स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुरवातीचे सहा संघ ठरणार पात्र

याबद्दल राहुल म्हणाला, 'मागच्या वर्षी जेव्हा मी मुंबई सिटीत आलो, तेव्हा माझे लक्ष्य होते की लीग शिल्ड जिंकावी आणि आयएसएलपण जिंकावं. त्यातील एक लीग शिल्ड जिंकण्याचे लक्ष्य पूर्ण झाले आहे. उद्या मी माझ्या मित्र, कुटुंबिय, चाहते, माझ्या स्थानिक चाहत्यांसमोर लीग शिल्ड घेणार आहे. त्यामुळे मला खूप अभिमान वाटत आहे आणि मी उद्याच्या दिवसाची वाट पाहातोय.'

याबरोबर मुंबईला आता लीग शिल्डबरोबर आयएसएलचे विजेतेपद जिंकण्याचीही संधी आहे. याबद्दल राहुल म्हणाला, 'आता आयएसएल जिंकायचे टार्गेट आहे. पण त्याआधी आम्हाला तीन सामने खेळायचे आहेत. उद्याचा एक आणि दोन सेमीफायनलचे सामने. आमचा फोकस आम्ही कसे तयारी करणार यावर आहे.'

याशिवाय प्रशिक्षक दे बकिंगघम यांच्या सहकार्याबद्दल देखील राहुलने समाधान व्यक्त केले आहे. तो म्हणाला, 'प्रशिक्षकांनी सिनियर आणि ज्युनियर भारतीय खेळाडूंना खूपच आत्मविश्वास दिलाय. ते समजून घेतात. मित्र म्हणून वागतात. या गोष्टींमुळे मदत झाली असून त्याचा फायदाही खेळाडूंनी घेतला आहे. तुम्ही पाहिलं तर भारतीय खेळाडूही सध्या चांगली कामगिरी करत आहेत. या गोष्टींची त्यांना मदत झाली आहे आणि आशा आहे की पुढच्या हंगामातही त्यांना याची मदत होईल आणि ते खेळाडू म्हणून अजून चांगले घडतील.'

Rahul Bheke
ISL Football: एफसी गोवा संघासमोर 'करो या मरो'ची स्थिती; प्ले ऑफ फेरीत प्रवेशासाठी विजय अत्यावश्यक

ईस्ट बंगालबरोबर होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्याबद्दल राहुल म्हणाला, 'आमचा दृष्टीकोन सारखाच असेल, जसा याआधीच्या 19 सामन्यांसाठी होता. आम्हाला हा सामनाही जिंकायचा आहे आणि साखळी फेरीचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. आम्हाला आमचा अखेरचा साखळी सामना घरच्या मैदानावर खेळून तीन पाँइंट्स मिळवायचे आहेत.'

ईस्ट बंगाल यापूर्वीच आयएसएल प्लऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे, तर मुंबईने यापूर्वीच प्लेऑफमधील जागा पक्की केली आहे. त्यामुळे शेवटच्या साखळी सामन्यात बेंच स्ट्रेंथला संधी मिळणार का, असा प्रश्न विचारल्यावर राहुल म्हणाला, 'बेंच स्ट्रेंथबद्दल प्रशिक्षकांना जास्त माहिती असेल. पण ज्यालाही संधी मिळेल, तो त्याचे सर्वोत्तम देऊन हा सामना जिंकण्यासाठीच प्रयत्न करेल.'

मुंबईला बंगळुरूविरुद्ध स्विकारावा लागलेला पराभव एकप्रकारे संघाला जागा करणारा कॉल होता का असे विचारल्यावर राहुल म्हणाला, 'खरंतर आम्ही बाकी सामन्याप्रमाणेच या सामन्यासाठीही तयारी केली होती. पण वैयक्तिकरित्या खेळाडू या सामन्यातील पराभवाला वेक-अप कॉलसारखे घेऊ शकतात आणि हे चांगले झाले की पुढच्या फेरीआधीच साखळी फेरीमध्येच पराभव झाला.'

'आता आपण काय चूकी केल्या हे लक्षात येईल, त्या चूका उद्याच्या सामन्यात सुधारून साखळी फेरीचा शेवट चांगला करायचा आहे आणि सेमीफायनलसाठी तयारी करायची आहे.'

Rahul Bheke
ISL Football: एफसी गोवा ‘टॉप सिक्स’मधून बाहेर

आता संघ कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करणार याबद्दल राहुल म्हणाला, 'सर्वच गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करणार आहोत, सेमीफायनलमध्ये गुणतालिका महत्त्वाची नसणार आहे. सेमीफायनलमध्ये होम - अवे सामने असतील, त्यामुळे खूप महत्त्वाचे आहे की दोन्ही सामने खूप गंभीरतेने, युक्तीने आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे खेळाचेत. त्यामुळे मानसिकरित्या आम्ही कसे सज्ज असू हे खूप महत्त्वाचे असेल. मुख्य फायनलआधी दोन्ही सेमीफायनल एकप्रकारे दोन फायनल खेळायच्यात असे समजून खेळू.'

त्याचबरोबर ईस्ट बंगालविरुद्ध कोणा एका खेळाडूवर लक्ष्य केंद्रित करण्यापेक्षा संपूर्ण संघालाच कसे रोखता येईल, याकडे लक्ष देणार असल्याचेही राहुलने सांगितले. तसेच चूका टाळण्याचा प्रयत्न करायचा असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबईचा ग्रेग स्टिवर्ट सध्या दुखापतग्रस्त आहे. त्याच्याबद्दल राहुल म्हणाला, की तो कधी बरा होईल, हे मेडिकल टीम सांगू शकेल, पण तो लवकरच बरा होईल आणि पुढील सामन्यांसाठी उपलब्ध राहिल, अशी आशा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com