Virat Kohli Records In Visakhapatnam: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीची मोठी खेळी पाहायला मिळू शकते.
कदाचित विराट शतक झळकावताना दिसू शकतो. अशा परिस्थितीत विराट आपल्या आवडत्या मैदानावर मोठी धावसंख्या उभारु शकेल, अशी आशा आहे.
विशाखापट्टणममध्ये फलंदाजी करताना विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर उत्कृष्ट विक्रम आहेत. भारताकडून या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट पहिल्या क्रमांकावर आहे. या मैदानावर विराटने 6 सामन्यात 556 धावा केल्या आहेत. इतक्याच सामन्यांमध्ये त्याने 3 शतके आणि 2 अर्धशतकेही केली आहेत. या मैदानावर त्याची सर्वोच्च धावसंख्या 157 धावांची आहे. विराटने 2010 मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 118 धावांची मॅच विनिंग इनिंग खेळली होती.
टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा विशाखापट्टणम येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडेत पुनरागमन करणार आहे. पहिल्या सामन्यात संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले होते. विराटनंतर रोहित शर्मा हा या मैदानावर भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे.
रोहितने 6 सामन्यात 1 शतकासह 342 धावा केल्या आहेत. 2019 मध्ये रोहितने याच मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध 159 धावांची मोठी खेळी खेळली होती. अशा परिस्थितीत त्याच्या बॅटने कमाल केली तर टीम इंडिया विजयाचा मजबूत दावा सादर करु शकते.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली, शमी-सिराजने सर्वाधिक 3-3 विकेट आपल्या नावावर केल्या, त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ 188 धावांवर गारद झाला.
याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाच्या 4 विकेट झटपट पडल्या, पण केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने सामना शेवटपर्यंत नेला आणि संघाला 5 विकेटने विजय मिळवून दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.