virat kohli aggressive celebration ms dhoni wicket abuse fans reaction rcb vs csk ipl 2022 Danik Gomantak
क्रीडा

विराट कोहलीने एमएस धोनीला केली शिवीगाळ? व्हिडीओ व्हायरल

ट्विटरवर चाहत्यांच्या संतापाचा उडाला भडका

दैनिक गोमन्तक

चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये सामना झाला. या सामन्यात आरसीबीने चेन्नईचा 13 धावांनी पराभव केला. सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सामन्यात केवळ दोन धावा करून बाद झाला.

महेंद्रसिंग धोनी आऊट झाला, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र याचदरम्यान आरसीबीच्या विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एमएस धोनीची विकेट पडल्यावर विराट कोहली उत्साहात साजरा करताना दिसत आहे.

विराट कोहली उत्साहात काहीतरी बोलताना दिसत आहे. या प्रतिक्रियेवर ट्विटर युजर्सनी किंग कोहलीला फटकारले आहे. एमएस धोनीच्या विकेटवर विराट कोहलीला अशाप्रकारे शिवीगाळ करणे हे त्याचे चारित्र्य दर्शवते, अस मत चाहत्यांनी व्यक्त केले आहे.

दुसरीकडे, विराट कोहलीचे चाहते म्हणतात की विराट कोहलीचा हा एक उत्सव आहे, त्यामुळे कुणालाही याचे वाईट वाटू नये. त्याचवेळी धोनीचे चाहते सहमत नाहीत आणि विराट कोहलीवर राग काढत आहेत. एमएस धोनी हा भारतीय लष्कराचा अधिकारी आहे, त्यामुळे असे शब्द वापरणे त्याच्यासाठी वाईट असल्याचे चाहत्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे विराट कोहली मैदानावर अनेकदा उत्साहात दिसतो आणि त्याचे सेलिब्रेशन इतरांपेक्षा वेगळे असते. अनेकवेळा विराट कोहलीचे हे वागणे वादाचा आणि चर्चेचा विषयही ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Salaulim Dam: साळावली धरण अखेर 'ओव्‍हरफ्‍लो', यंदा तब्‍बल 35 दिवसांचा विलंब; पर्यटकांसाठी निसर्गाचा आकर्षक नजराणा

Rohit Sharma Message Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची भावनिक पोस्ट; म्हणाला, "अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये..."

Almo Mountain Wild Mushrooms: अळिंबांची भूमी असलेला 'अळमो डोंगर' हरवून बसलाय ओळख

CWG 2026: नीरज चोप्राकडून 'सुवर्णपदका'ची अपेक्षा; भालाफेक अंतिम सामना कधी, किती वाजता अन् कुठे पाहता येईल? जाणून घ्या

खरी कुजबूज: फातोर्ड्यातील 'पॉलिटिक्स'

SCROLL FOR NEXT