Jonty Rhodes Dainik Gomantak
क्रीडा

Jonty Rhodes Video Viral: जॉन्टी ऱ्होड्सच्या माणूसकीनं मन जिंकलं! ग्राउंड्समनच्या मदतीला असा आला धावून...

लखनऊ सुपर जायंट्सचा प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सने ग्राउंड्समनला केलेल्या मदतीने सर्वांची मनं जिंकली आहेत.

Pranali Kodre

Jonty Rhodes Helping Hands to Groundstaff: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार होता.

पण भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा सामना 19.2 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे रद्द करण्यात आला होता. पण या सामन्यात दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने ग्राउंड्समनला केलेल्या मदतीने सर्वांची मनं जिंकली आहेत.

या सामन्यात लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी केली होती. पण 19.2 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि सामना थांबवण्यात आला. दरम्यान, पाऊस येत असताना ग्राउंड्समन खेळपट्टी झाकण्यासाठी कव्हर्स मैदानात घेऊन येत होते.

यावेळी लखनऊचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सने ग्राउंड्समनला मदतीचा हात पुढे केला. त्याने त्यांच्याबरोबर ते कव्हर मैदानात ओढत आणले. यावेळी एका सदस्याने त्याला आदराने कव्हर ओढण्याचे काम न करण्यास सांगितले.

पण जॉन्टी त्याचे न ऐकता पुन्हा ग्राउंड्समनला मदतीसाठी गेला. यावेळी तो त्या सदस्याला मजेने चिडवतानाही दिसला.

हा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओने अनेक चाहत्यांची मने जिंकली असून लाखो युजर्सने लाईक्स दिल्या आहेत. तसेच चाहते ऱ्होड्सचे कौतुकही करत आहे.

सामना रद्द

दरम्यान, बुधवारी लखनऊ विरुद्ध चेन्नई सामन्यात नाणेफेकीलाही पावसामुळे उशीर झाला होता. मात्र 19.2 षटकात लखनऊने 7 बाद 125 धावा केल्या असताना पावसाला पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर हा सामना पुन्हा सुरू झाला नाही. तसेच हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामना थांबला तेव्हा लखनऊकडून आयुष बदोनीने सर्वाधिक नाबाद 59 धावा केलेल्या होत्या. तसेच चेन्नईकडून मोईन अली, मथिशा पाथिराना आणि महिश तिक्षणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.

हा सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आले. आता चेन्नईला त्यांचा पुढील सामना 6 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. तसेच लखनऊला त्यांचा पुढील सामना गुजरात टायटन्सविरुद्ध 7 मे रोजी खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

SCROLL FOR NEXT