IPL 2023: जरा हटकेच! रोहितने टॉस जिंकल्यावर थेट धवनलाच विचारलं 'काय करू'? Video एकदा पाहाच

Video: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यावर थेट पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनलाच काय निर्णय घ्यायचा असं विचारलं होतं
Rohit Sharma - Shikhar Dhawan
Rohit Sharma - Shikhar Dhawan Dainik Gomantak

Rohit Sharma - Shikhar Dhawan Funny moments: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी 46 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळवला जात आहे. पंजाबच्या घरच्या मैदानावर म्हणजेच पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पण रोहितने गोलंदाजी करण्याचा निर्णय चक्क प्रतिस्पर्धी संघाचा म्हणजेच पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनला विचारून घेतला. त्यांच्यातील या ब्रोमान्सचा व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंटवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Rohit Sharma - Shikhar Dhawan
LSG ला दुहेरी धक्का! फक्त केएल राहुलच नाही, 'हा' खेळाडूही IPL 2023 मधून बाहेर, मिळणार नवा कॅप्टन

झाले असे की नाणेफेकीसाठी दोन्ही संघांचे कर्णधार रोहित आणि शिखर मैदानात आले होते. यावेळी रोहितने नाणेफेक जिंकली, त्यानंतर त्याचा निर्णय सांगण्यापूर्वी त्याने गमतीने शिखरला विचारले, काय करू सांग, त्यावर शिखरने पण हसून उत्तर दिले गोलंदाजी कर.

या नंतर दोघेही हसले. त्यानंतर रोहितने याबद्दल हसत सांगितले की मी शिखर धवनला विचारले की काय करू. त्याने सांगितले गोलंदाजी कर, त्यामुळे आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहे.'

दरम्यान, या गोष्टी गमतीने झाल्या असल्या, तरी रोहितने प्रथम गोलंदाजी निवडण्यामागचे खरे कारणही स्पष्ट केले. तो म्हणाला, 'ही खेळपट्टी चांगली आहे. आम्ही आव्हानाचा पाठलाग चांगला करतो, त्यामुळे आम्ही आमच्या ताकदीवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला. अशा खेळपट्ट्यांवर तुम्हाला तुमच्या नावापुढे चांगल्या धाव असलेल्या नक्कीच अवडतील.'

तसेच नंतर शिखरनेही सांगितले की त्याने देखील जर नाणेफेक जिंकली असती, तर गोलंदाजीच निवडली असती. तसेच खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. पण याबरोबरच त्याने सांगितले की आता मोठी धावसंख्या उभारून मुंबईला मोठे आव्हान देण्याचा पंजाबचा प्रयत्न राहिल.

दरम्यान या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने एक बदल केला आहे. रिली मॅरेडिथला दुखापत झाल्याने त्याच्याऐवजी आकाश मधवालला पंजाबविरुद्ध संधी दिली आहे. तसेच पंजाबने मॅथ्यू शॉर्टला संधी दिली असून कागिसो रबाडा प्लेइंग या सामन्यामधून बाहेर झाला आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टिम डेविड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अरशद खान

  • पंजाब किंग्स - प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चाहर, अर्शदीप सिंग

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com