KL Rahul  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: केएल राहुलच्या फ्लॉप शो वर चिडला व्यंकटेश प्रसाद; 'काही भाग्यवान असतात, तर...'

KL Rahul: भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुलचा फ्लॉप शो रेड-बॉल फॉरमॅटमध्ये सुरु आहे.

Manish Jadhav

IND vs AUS: भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुलचा फ्लॉप शो रेड-बॉल फॉरमॅटमध्ये सुरु आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 71 चेंडूंचा सामना केल्यानंतर त्याला 1 चौकाराच्या मदतीने केवळ 20 धावा करता आल्या.

राहुलने जानेवारी 2022 पासून कसोटी क्रिकेटमध्ये एकही अर्धशतकी खेळी खेळलेली नाही. अर्धशतक तर सोडाच, पण तो साधा 25 चा आकडाही गाठू शकलेला नाही.

मात्र, निराशाजनक कामगिरी करुनही राहुलला सातत्याने संधी मिळत आहेत, ज्यावर अनेक क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी खेळाडूंनी आक्षेप घेतला आहे.

या एपिसोडमध्ये आता भारताचा (India) माजी दिग्गज गोलंदाज व्यंकटेश प्रसादचेही नाव जोडले गेले आहे. त्याने राहुलच्या कसोटी संघातील निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुलमुळे अनेक खेळाडू बेंचवर बसले असून अनेकांना संधी मिळत नसल्याचे प्रसादने म्हटले आहे.

प्रसादने शनिवारी ट्विटरवर लिहिले की, 'केएल राहुलच्या (KL Rahul) क्षमतेबद्दल मला माहिती आहे, परंतु दुर्दैवाने त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 वर्षे घालवल्यानंतर 46 कसोटी सामन्यांमध्ये 34 ही सरासरी अत्यंत सामान्य आहे. असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना इतक्या संधी दिल्या गेल्या नाहीत.'

व्यकंटेश पुढे म्हणाला की, “असे अनेक खेळाडू आहेत, जे शानदार फॉर्ममध्ये आहेत. मात्र ते संधीची प्रतीक्षा करत आहेत. शुभमन गिल शानदार फॉर्ममध्ये आहे, सरफराज प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतके झळकावत आहे. मात्र, काही भाग्यवान आहेत, ज्यांना यशस्वी होण्यासाठी भरपूर संधी दिल्या जातात, तर काहींना त्याही मिळत नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राहुल हा उपकर्णधार आहे. राहुलपेक्षा मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी हे कसोटीपटू अधिक प्रभावी ठरले असते.''

व्यकंटेश पुढे असेही म्हणाला की, “राहुलची निवड कामगिरीच्या आधारावर नाही, तर पक्षपाताच्या आधारावर करण्यात आली आहे. आठ वर्षांत तो आपली प्रतिभा सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. अनेक माजी क्रिकेटपटू हे बघूनही पक्षपातीपणाकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना आयपीएलमधील संधी गमावण्याची भीती वाटते. त्यांना कोणत्याही फ्रँचायझीच्या कर्णधाराशी वैर करायचे नाही. सहसा शुभचिंतक हे तुमचे चांगले टीकाकार असतात पण काळ बदलला आहे आणि लोक सत्य बोलायला घाबरतात.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By- Election: आम्ही चालवू पुढे 'बाबां'चा वारसा! रितेशनी घेतला रवींच्या कार्यालयाचा ताबा, उमेदवारीबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य

Horoscope: 'या' 3 राशींचे नशीब चमकणार! गुरु-शुक्र केंद्र योग देणार अफाट यश आणि धनलाभ; करिअर आणि व्यवसायातही होणार मोठी प्रगती

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! कोकण रेल्वे स्टेशनजवळ दुचाकींच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आरोपी फरार

Goa Today's News Live: गोव्याचा 'अभिनव' पुन्हा चमकला, पंजाबविरुद्ध झळकावलं दमदार शतक!

Amazon Layoffs: टेक विश्वात खळबळ! ॲमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, दोन टेक्स्ट मेसेज पाठवून केली सर्वात मोठी कर्मचारी कपात

SCROLL FOR NEXT