Usman Khawaja forced to remove dove bat sticker  X
क्रीडा

NZ vs AUS: ख्वाजाला सामन्यादरम्यानच का काढून टाकावे लागले बॅटवरील पक्ष्याचे स्टिकर, जाणून घ्या प्रकरण

Usman Khawaja Bat Sticker: न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत उस्मान ख्वाजाला त्याच्या बॅटवरील पक्ष्याचे स्टिकर काढून टाकावे लागले.

Pranali Kodre

Usman Khawaja forced to remove dove bat sticker

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनला होत असून या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी एक घटना बरीच चर्चेत राहिली, ही घटना म्हणजे उस्मान ख्वाजाला त्याच्या बॅटवरील कबुतराचे स्टिकर काढून टाकावे लागले.

झाले असे की तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात तो फलंदाजी करत होता. यावेळी त्याची बॅट तुटल्याने त्याला दुसरी बॅट मागवावी लागली. त्यामुळे मॅट रेनशॉ त्याच्या किटमधून बॅट घेऊन आला. परंतु ख्वाजाने जी बॅट निवडली, त्यावर त्याने कबुतराचे स्टिकर लावलेले होते.

त्यामुळे त्याने आधी ते स्टिकर काढले आणि मग पुन्हा फलंदाजी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याची ही कृती चर्चेचा विषय ठरली. कारण आयसीसीने त्याला यासाठी परवानगी दिलेली नाही.

ख्वाजाने यापूर्वीच बॅटवर कबुतराचे स्टिकर लावून खेळण्यासाठी आयसीसीकडे परवानगी मागितली होती. परंतु, आयसीसीने त्याला त्यात राजकिय संदेश असल्याने परवानगी नाकारली होती.

खरंतर ख्वाजा यापूर्वीही अशा गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. गाजामध्ये चाललेल्या युद्धाच्या विरोधात त्याने यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दंडाला काळी फित बांधली होती. त्यामुळे त्याला आयसीसीने फटकारले देखील होते.

तसेच त्याची त्यावेळी संदेश लिहिलेले शुज घालण्याचीही इच्छा होती. परंतु, त्याला तसे करण्यासही मनाई करण्यात आली होती. दरम्यान, ख्वाजाने सरावादरम्यान मात्र कबुतराचे स्टिकर असलेलीच बॅट वापरली आहे.

तसेच लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले आणि कर्णधार पॅट कमिन्सने मात्र ख्वाजाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की त्याला त्याची मतं मांडण्याचा अधिकार आहे.

दरम्यान, आयसीसीच्या नियमानुसार कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा वांशिक कारणांशी संबंधित संदेश प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिली जात नाही.

सामना रोमांचक वळणावर

सामन्यात ख्वाजाला फलंदाजी खास काही करता आले नाही. त्याने पहिल्या डावात 33 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 28 धावा केल्या. या सामन्यात पहिल्या ऑस्ट्रेलियाने 115.1 षटकात सर्वबाद 383 धावा केल्या.

तसेच न्यूझीलंडला 43.1 षटकात सर्वबाद 179 धावाच करता आल्या. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही 51.1 षटकात अवघ्या 164 धावांवर संपला. पण पहिल्या डावातील आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर 369 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने 41 षटकात 111 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: प्रियकरासाठीच आईने पोटच्या गोळ्याचा गळा घोटला; रुग्णालयात नेले म्हणून प्रकरणाला वाचा फुटली

Viral Video: फोन चोरीपासून वाचवण्याचा तरुणाचा 'Z+ सिक्युरिटी' फॉर्म्युला, ट्रेनमधील अतरंगी व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "भावाला कशाचीच भीती नाही..."

T20 World Cup 2026: 'टी20 वर्ल्ड कप'साठी सर्व 20 संघ निश्चित; नेपाळ, ओमाननंतर जपानला हरवून यूएईनं तिकीट केलं पक्क; पाहा संपूर्ण यादी

रवींच्या निधनामुळे दुखवटा असताना सरकारने आयोजित केला सांस्कृतिक कार्यक्रम? सरकार असंवेदनशील असल्याचे काँग्रेसची टीका

Suicide Attack In Pakistan: पाकिस्तानी सैन्याच्या चेकपोस्टला पुन्हा बनवले निशाणा! आत्मघाती हल्ल्यात 20 सैनिक मारल्याचा दावा, धडकी भरणारा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT