Lords Ashes Test: वाद संपता संपेना! लॉर्ड्सवर ख्वाजा-वॉर्नर MCC सदस्यांशी भिडले, तिघांचं निलंबन

Ashes 2023: लॉर्ड्स कसोटीतील अखेरच्या दिवशी ख्वाजा आणि वॉर्नर यांचे MCC सदस्यांशी वाद झाल्याचे दिसले होते.
Lords Test
Lords TestDainik Gomantak

Usman Khawaja & David Warner Heated Exchange With MCC Members: ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या ऍशेस 2023 मालिकेतील दुसऱ्या कसोटीत 43 धावांनी विजय मिळवला. पण हा सामना काही वादांमुळे बराच चर्चेत राहिला. दरम्यान, याच सामन्यात उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नरचीही लाँग रुममधून जाताना मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या काही सदस्यांबरोबर वाद झाले.

रिपोर्ट्सनुसार लॉर्ड्सची मालकी असलेल्या मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या काही सदस्यांनी दुसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच रविवारी लंच ब्रेक झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये ऑस्ट्रेलिया संघ परतत असताना काही अपशब्द वापरले.

त्यामुळे उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांची त्यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी सुरक्षारक्षकांना आणि पंचांना मध्यस्थी करावी लागली. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत झाले.

Lords Test
Bairstow Run-Out: पाय घासून पुढं आला तरी बेअरस्टो रनआऊट कसा झाला? नियम नक्की आहे काय?

दरम्यान, लंच ब्रेकपूर्वी इंग्लंडने जॉनी बेअरस्टोची विकेट धावबादच्या रुपात गमावली होती. पण त्याची ही विकेट वादग्रस्त ठरली. दुसऱ्या डावातील 52 व्या षटकात त्याने चेंडू सोडल्यानंतर पुढे जात असताना ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरीने त्याला धावबाद केले होते.

त्यावेळी नियमानुसार पंचांनी बेअरस्टोला 10 धावांवर बाद दिले होते. त्यानंतर या घटनेवर बरीच चर्चा झाली. दरम्यान, लॉर्ड्समधील प्रेक्षकांकडून ऑस्ट्रेलियन संघाची हुर्याही उडवण्यात आली.

मात्र, त्यानंतर जेव्हा लंचब्रेक झाला, त्यावेळी एमसीसी सदस्यांकडूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अपशब्द वापरण्यात आले.

Lords Test
Ashes 2023: गिल आऊट, पण डकेट नॉटआऊट! स्टार्कच्या कॅचवर चर्चांना उधाण, पण नियम काय सांगतो?

त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून एक निवेदन जारी करण्यात आले, ज्यात त्यांनी म्हटले की 'ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाने मेरिलबोन क्रिकेट क्लबला विनंती केली आहे की लंचब्रेक वेळी मेंबर्स क्षेत्रातील काही घटनांची चौकशी व्हावी. ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू आणि स्टाफ यांनी प्रेक्षकांकडून अपशब्द वापरले गेल्याचा आरोप केला आहे, काही जणांशी शारीरिक संपर्क साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला.'

त्यानंतर एमसीसीने ऑस्ट्रेलियन क्रिकेटची माफी मागितली. तसेच एमसीसीच्या 3 सदस्यांवर निलंबनाचीही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या 3 सदस्यांना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर येता येणार नाही.

दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मॉर्गननेही म्हटले की त्याने अनेक सामने या मैदानावर खेळले, पण लाँग रुममध्ये अशी घटना कधीही पाहिली नव्हती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com