Usman Khawaja: ख्वाजावर ICC कडून कारवाईचा बडगा! पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत घातलेला ब्लॅक आर्मबँड

ICC: उस्मान ख्वाजावर आयसीसीकडून कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
Usman Khawaja
Usman KhawajaICC
Published on
Updated on

Usman Khawaja charged by ICC for wearing a black armband without approval during Australia vs Pakistan at Perth:

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर उस्मान ख्वाजावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून कारवाई केली जाणार असल्याचे समजत आह. त्याने आयसीसीची परवानगी न घेता पाकिस्तानविरुद्ध पर्थला झालेल्या कसोटी सामन्यात दंडाला काळी पट्टी बांधली होती.

ख्वाजा या सामन्यापूर्वीपासूनच चर्चेत आला होता. त्याने सरावावेळी गाझावर आलेल्या मानवतावादी संकटाबद्दल जागृकता पसरवणारे संदेश त्याच्या शुजवर लिहिले होते. 'सर्व जीव समान आहेत' आणि 'स्वातंत्र्य हा मानवी हक्क आहे', असे ते संदेश होते. नंतर हे शुज त्याने सामन्यात घातले नाहीत, मात्र दंडाला काळी पट्टी बांधली होती.

Usman Khawaja
IND vs AUS: चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 'हे' पाच रेकॉर्ड्स, अश्विन अन् उस्मान ख्वाजा चमकले

इएसपीएनने दिलेल्या माहितीनुसार आता त्याने काळी पट्टी दंडाला बांधल्याबद्दल आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली आहे. याबद्दल आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की 'ख्वाजावर कपडे आणि इतक साधनांच्या नियमाच्या कलम एफचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.'

'उस्मान ख्वाजाने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी दरम्यान आयसीसीची आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाची परवानगी न घेता त्याचा वैयक्तिक संदेश प्रदर्शित केला. हे उल्लंघन 'इतर उल्लंघन'च्या श्रेणीत येत असून त्यावर पहिल्या गुन्ह्यासाठी शिक्षा मंजूर झाली आहे.'

दरम्यान, खेळाडू बऱ्याचदा मैदानात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे किंवा माजी खेळाडूचे किंवा कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यास दंडाला काळी पट्टी घालून मैदानात उतरतात. मात्र, त्याआधीही त्यांना त्यांच्या राष्ट्रीय बोर्डाकडून आणि आयसीसीकडून परवानगी घ्यावी लागते.

Usman Khawaja
Ashes 2023: हायव्होल्टेज ड्रामा! ख्वाजा अन् रॉबिन्सन भर मैदानात भिडताच अँडरसनची मध्यस्थी, व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की अद्याप ख्वाजावर काय कारवाई केली जाणार याबद्दल निर्णय होणे बाकी आहे.

तथापि, त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही कारण त्यासाठी इतक्या मोठ्या शिक्षेची तरतुद नाही. त्याला जास्तीत जास्त फटकारले जाऊ शकते किंवा चौथ्यांदा जरी अशी चूक १२ महिन्यांत झाली, तरी त्याच्यावर जास्तीत जास्त सामना शुल्काच्या ७५ टक्के दंड आकारला जाऊ शकतो.

आयसीसीकडून कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा वांशिक कारणांशी संबंधित संदेश प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिली जात नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com