Uday Saharan, U19 World Cup Century Dainik Gomantak
क्रीडा

U19 World Cup: उदय सहारनचे शानदार शतक; किंग कोहलीच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

Uday Saharan, U19 World Cup Century: अंडर-19 विश्वचषक 2024 मधील सुपर सिक्सचा दुसरा सामना टीम इंडिया आणि नेपाळ यांच्यात खेळला जात आहे.

Manish Jadhav

Uday Saharan, U19 World Cup Century: अंडर-19 विश्वचषक 2024 मधील सुपर सिक्सचा दुसरा सामना टीम इंडिया आणि नेपाळ यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार उदय सहारनने शानदार शतक झळकावले. त्याच्यासोबत सचिन धसनेही शतक झळकावले.

पण दरम्यान, उदय सहारनचे शतक चर्चेचा विषय ठरले, कारण त्याने विराट कोहलीशी बरोबरी केली. विशेष म्हणजे, उदयने फक्त विराट कोहलीच नाही तर उन्मुक्त चंद, यश धुलसह विराटशी बरोबरी केली आहे. अंडर-19 विश्वचषकात शतक झळकावणारा तो चौथा कर्णधार ठरला आहे. त्याच्या आधी फक्त तीन कर्णधारांनी ही कामगिरी केली होती. आता तो असा चौथा भारतीय कर्णधार बनला आहे.

उदय सहारन शतक झळकावणारा चौथा कर्णधार ठरला

अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करणारा उदय सहारन या स्पर्धेत शतक करणारा चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहलीने 2004 मध्ये, उन्मुक्त चंदने 2012 मध्ये आणि यश धुलने 2022 मध्ये ही कामगिरी केली होती. या विश्वचषकात तो तिसरा भारतीय तर सचिन धस शतक झळकावणारा चौथा भारतीय ठरला. उदयने नेपाळविरुद्ध 107 चेंडूत 100 धावांची खेळी केली. तर सचिनने 101 चेंडूत 116 धावा केल्या.

कोण आहे उदय सहारन?

उदय सहारन याचा जन्म 8 सप्टेंबर 2004 रोजी गंगानगर, राजस्थान येथे झाला. त्याचे पूर्ण नाव उदय प्रताप सहारन. त्याने वयाच्या 19 व्या वर्षी भारताच्या 19 वर्षांखालील संघाची कमान सांभाळली. तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. आतापर्यंत, त्याने भारतासाठी (India) 12 युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 डावात 505 च्या सरासरीने 505 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर दोन शतके आणि 3 अर्धशतके आहेत. चालू विश्वचषकात त्याने बांगलादेश आणि आयर्लंडविरुद्ध दोन अर्धशतके झळकावली. आता त्याने शतकही केले आहे.

दरम्यान, उदयच्या वडिलांचे नाव संजीव प्रताप असून ते व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. उदयच्या वडिलांनाही लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. पण काही कारणांमुळे त्यांना क्रिकेटची आवड जोपासता आली नाही. पण त्यांनी लहानपणापासूनच उदयमधील क्रिकेटचे कौशल्य ओळखले.

विशेष म्हणजे, वयाच्या 13-14 व्या वर्षी त्यांनी उदयला घरातून पंजाबला पाठवले. पंजाबमध्ये तो भटिंडा संघाकडून अंडर-14, अंडर-16 आणि अंडर-19 मध्ये खेळला. त्यानंतर 2022 अंडर-19 विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून त्याची निवड झाली. त्यावेळी, टीम इंडियाने यश धुलच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला होता. परंतु त्याला त्यावेळी टीम इंडियात संधी मिळाली नव्हती. मात्र, आता तो या वर्षी टीम इंडियाचा कर्णधार आहे.

विश्वचषकात भारताची 5 शतके

भारताने अंडर 19 विश्वचषक 2024 मध्ये 5 शतके झळकावली आहेत. यात मुशीर खानने दोन शतके झळकावली. अर्शिन कुलकर्णी, उदय सहारन आणि सचिन धस यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले. भारताचे विश्वचषकातील ही सर्वाधिक शतके आहेत. याआधी यश धुल, अंगकृष्ण रघुवंशी आणि राज अंगद बावा यांनी 2022 च्या विश्वचषकात शतके झळकावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT