Rope Skipping Championship: राष्ट्रीय रोप स्किपिंगमध्ये गोव्याची उल्लेखनीय कामगिरी! पटकावली 24 पदके

Goa Rope Skipping Championship Medals: इंडियन रोप स्किपिंग फेडरेशनशी संलग्न अमॅच्युअर रोप स्किपिंग असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने अलिबाग येथे नुकतीच राष्ट्रीय पातळीवरील रोप स्किपिंग स्पर्धा उत्साहात पार पडली.
Goa rope skipping medals
Goa rope skipping medalsDainik Gomantak
Published on
Updated on

पर्ये: इंडियन रोप स्किपिंग फेडरेशनशी संलग्न अमॅच्युअर रोप स्किपिंग असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने अलिबाग येथे नुकतीच राष्ट्रीय पातळीवरील रोप स्किपिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत देशातील १६ राज्यांतील ४०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या पाच वयोगटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत गोवा संघाने १० सुवर्ण, ७ रौप्य व ७ कांस्य अशी एकूण २४ पदके पटकावून राज्याचा नावलौकिक वाढविला.

१२ वर्षांखालील मुलींच्या गटात श्रावणी कुंभार हिने डबल अंडर्स प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला तर ईशान्या हरमलकर व विद्या घाडी यांनी एन्ड्युरन्स प्रकारात अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळविले. स्पीड डबल अंडर्स रिले प्रकारात गोव्याच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात लवेश नाईक प्रथम, रौनक घाडी तृतीय, तर स्पीड डबल अंडर्स रिले प्रकारात गोव्याच्या एका संघाने प्रथम व दुसऱ्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात पूर्वी कामत हिने स्पीड स्प्रिंट व एन्ड्युरन्स या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.

Goa rope skipping medals
Vijay Hazare Trophy: सलग दुसरे शतक, 14 वेळा चेंडू सीमापार! ललितच्या कारनाम्यामुळे गोव्याची घोडदौड; सिक्कीम पराभूत

१७ वर्षांखालील व १७ वर्षांवरील गटांतही गोव्याच्या खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पदके मिळविली.

Goa rope skipping medals
GCA Sports Project : 'क्रिकेट स्टेडियम अन्यत्र नेल्यास रस्त्यावर उतरू'! आजगावकर यांचा इशारा; GCAने पायाभरणी करण्याची केली मागणी

उत्‍कृष्‍ट कामगिरी करणारे खेळाडू

श्रावणी कुंभार (डबल अंडर्स प्रथम), ईशान्या हरमलकर (एन्ड्युरन्स द्वितीय), विद्या घाडी (एन्ड्युरन्स तृतीय), लवेश नाईक (१४ वर्षांखालील प्रथम), पूर्वी कामत (स्पीड स्प्रिंट व एन्ड्युरन्स प्रथम), डबल डच स्पीड (संघ प्रथम व द्वितीय).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com