U19 World Cup: मुशीर खानचं झळकावलं दुसरं शतक! भारताचे न्यूझीलंडसमोर 296 धावांचे लक्ष्य

India U19 vs New Zealand U19: 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेच भारतीय संघाने मुशीर खानच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंड समोर 296 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Musheer Khan
Musheer KhanX/ICC

U19 World Cup 2024, India vs New Zealand:

दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीला मंगळवारी (30 जानेवारी) सुरुवात झाली आहे. या फेरीत मंगळवारी भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होत आहे.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर 296 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने 50 षटकात 8 बाद 295 धावा केल्या. भारताकडून मुशीर खानने शतकी खेळी केली. हे त्याचे या स्पर्धेतील दुसरे शतक आहे.

Musheer Khan
Sarfaraz & Musheer Khan: सर्फराजपाठोपाठ भाऊ मुशीरही गाजवतोय मैदान! दोन्ही भावंडांनी एकाच दिवशी ठोकली भारतासाठी शतकं

ब्लोएमफाँटेनला चालू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून आदर्श सिंग आणि अर्शिन कुलकर्णी हे सलामीला फलंदाजीला उतरले.

परंतु, पाचव्याच षटकात अर्शिनने 9 धावांवर विकेट गमावली. परंतु, नंतर आर्दर्श सिंगला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या मुशीरने चांगली साथ दिली. या दोघांनीह भारताचा डाव पुढे नेत अर्धशतकी भागीदारी करून संघाला 100 धावांचा टप्पा सहज पार करून दिला.

मात्र अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच आदर्श झॅक कमिन्सविरुद्ध खेळताना ऑलिव्ह तेवातियाकडे झेल देत बाद झाला. त्याने 52 धावांची खेळी केली. यानंतर मुशीरने कर्णधार उदय सहारनला साथीला घेत 87 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, मुशीरने काही शानदार फटके खेळले.

Musheer Khan
IND Vs ENG: सर्फराज खानला टीम इंडियात संधी मिळताच वडीलांचा आनंद गगनात मावेना; म्हणाले...

दरम्यान, स्थिरावलेला सहारन 37 व्या षटकात बाद झाला. यानंतर मात्र भारताने नियमित अंतराने काही स्वस्तात विकेट्स गमावल्या. परंतु, एका बाजूने विकेट्स जात असताना मुशीरने डाव सावरत शतक ठोकले.

मात्र तो 48 व्या षटकात बाद झाला. त्याला मेसन क्लार्कने बाद केले. मुशीरने 126 चेंडूत 131 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 3 षटकार मारले.

याशिवाय भारताने अरावेल्ली अविनाश (17), प्रियांशू मोलिया(10), सचिन धस (15)आणि मुरुगन अभिषेक (4) यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. पण 50 षटकात भारताने 295 धावा उभारल्या.

न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मेसन क्लार्कने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच रायन त्सोरगस, झॅक कमिन्स, ऑलिव्हर तेवातिया आणि एवाल्ड श्रुडर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com