Goa Fire News: चोर्ला घाटात पहाटेच्या सुमारास भीषण आग, बोलेरो टेम्पो जळून खाक; 5 लाखांचे नुकसान

Chorla ghat accident news: या आगीत संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला असून मालकाचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे
Chorla ghat fire
Chorla ghat fireDainik Gomantak
Published on
Updated on

चोर्ला घाट: गोव्याला कर्नाटकशी जोडणाऱ्या चोर्ला घाटात मंगळवार (दि.३०) पहाटेच्या सुमारास एका भीषण आगीची घटना घडली. घाटातील 'व्हडले टम' या दुर्गम परिसरात एका बोलेरो टेम्पोला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला असून मालकाचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे या घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे.

मध्यरात्रीचा थरार आणि आगीचे रौद्ररूप

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ३० डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ३:५१ च्या सुमारास ही घटना घडली. कर्नाटक येथील सचिन मरिअप्पा यांच्या मालकीचा बोलेरो टेम्पो (क्रमांक KA-34-C-5167) चोर्ला घाटातून प्रवास करत असताना अचानक वाहनातून धूर निघू लागला.

चालक काही समजण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. घनदाट जंगल आणि पहाटेची वेळ असल्याने सुरुवातीला मदत मिळण्यात अडचणी आल्या.

Chorla ghat fire
Goa Nightclub Fire: ‘बर्च’ नाईटक्लब आगप्रकरणी नवी अपडेट! गोवा खंडपीठासमोर अहवाल सादर; अवैध बांधकाम, नियमभंग, प्रशासनावर आसूड

वाळपई अग्निशमन दलाची धाव

घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. अग्रिशमन दलाचे पथक प्रमुख कृष्णा सी. नाईक यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

या पथकात अशोक व्ही. नाईक (Dopt), सुधाकर व्ही. गावकर, साईनाथ जी. सावंत आणि फाटी एल. कळमीसकर या जवानांचा समावेश होता. जवानांनी 'होस रील'चा वापर करून धगधगती आग आटोक्यात आणली. पहाटे ६:१५ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती, त्यानंतर आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.

लाखोंचे नुकसान आणि मालमत्तेची बचत

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या आगीत टेम्पोचे अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, जवानांच्या समयसूचकतेमुळे सुमारे २ लाख रुपयांची मालमत्ता आणि वाहनाचे काही भाग वाचवण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com