Pramod Bhagat Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Paralympics: प्रमोद भगतने बॅडमिंटन पुरुष एकेरीत जिंकले 'सुवर्णपदक'

या सुवर्णपदकासह भारताकडे आता टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) 16 पदके आहेत. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

दैनिक गोमन्तक

टोकियो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) प्रमोद भगतने (Pramod Bhagat) अफलातून कामगिरी करत बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे. पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रमोदचे सोशल मीडियावर अभिनंदन करण्यात येत आहे. या सुवर्णपदकासह भारताकडे आता टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 16 पदके आहेत. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. प्रमोद भगतने अंतिम फेरीत डॅनियन बेथेलचा 21-14, 21-17 असा पराभव करत सुवर्णपदकावर दावा केला. भारतीय शटलर प्रमोद भगतने उपांत्य फेरीत जपानच्या डेसुके फुजीहारावर 21-11, 21-16 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रमोदचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी लिहिले, 'प्रमोद भगत यांनी संपूर्ण राष्ट्राची मने जिंकली आहेत, तो एक विजेता आहे, त्यांचे यश लाखो लोकांना प्रेरणा देईल, त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बॅडमिंटनमध्ये सुवर्ण जिंकल्याबद्दल त्याचे सोशलमिडियावर अभिनंदन केले जात असून त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छाही दिल्या जत आहे.

भुवनेश्वरचा (Bhubaneswar) 33 वर्षीय खेळाडू सध्या मिश्र दुहेरी SL3-SU5 वर्गात कांस्य पदकाच्या शोधात आहे. भगत आणि त्याचा साथीदार पलक कोहली रविवारी कांस्य पदकाच्या प्लेऑफमध्ये जपानच्या डेसुके फुजीहारा आणि अकीको सुगिनो यांच्याशी लढतील. एसएल 3-एसयू 5 प्रकारात, भगत आणि पलक या जोडीला उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या हॅरी सुसंतो आणि लीने रात्री अक्तिला यांच्याकडून 3-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओमुळे त्याचा डावा पायाला इजा झाली होती. त्याने जागतिक स्पर्धेत चार सुवर्णांसह 45 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

त्याने BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गेल्या आठ वर्षात दोन सुवर्ण आणि एक रौप्य जिंकले. 2018 पॅरा एशियन गेम्समध्ये त्याने एक सुवर्ण आणि एक कांस्य जिंकले. सुहास यथीराज आणि कृष्णा नगर यांनीही आपापल्या वर्गात पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. ज्या खेळाडूंच्या पायात विकृती आहे त्यांना SL3 वर्गात सहभागी होण्याची परवानगी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

Viral Video: अंगावर चिखल उडवणाऱ्या कारचालकाची तरुणीनं मोडली चांगलीच खोड; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला...'

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

Vellim Church Attack: 13 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल! वेळ्ळी चर्च हल्ला प्रकरणातील सर्व 22 संशयितांची निर्दोष मुक्तता; मडगाव कोर्टाचा मोठा निर्णय

Rohit Arya Shot Dead : मुंबईतील RA स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य गोळीबारात ठार

SCROLL FOR NEXT