टोकियो: टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला जिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. तीच भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमनचा (India's star boxer Mary Kom) पराभव झाला आहे. कोलंबियाच्या इनग्रित वेलेंसियाने (Ingrit Valencia of Colombia) मेरी कोमचा 3-2 पराभव केला आहे. 48-51 किलो गटात वेलेंकियाने मेरी कोमचा टोकियो ऑलिंपिकमधील वाटचाल इथेच संपली आहे.
पहिल्या राऊंडमध्ये वेलेंसियाने मेरी कोमला मात दिली. तर दुसऱ्या राऊंडमध्ये मेरीने शानदार कमबॅक केले. परंतु तीसऱ्या राऊंडमध्ये वेलेंसिया मेरी पेक्षा भारी ठरली. वेलेंसियाला पंचांनी 30,29, 27, 29 आणि 28 अंक दिले. तर मेरीला 27, 28, 30, 28, आणि 29 असे गुण मिळाले. या पराभावामुळे सुपर मॉम मेरी कोमचे टोकियो ऑलिंपिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे.
या आधी सकाळी भारतीय मुक्केबाज सतीश कुमार याने 91 किलो वजनी गटात विजय मिळवत धमाक्यात पदार्पण केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.