स्टार भारतीय बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने(Lovlina Borgohain) आपल्या अविसमरणीय कामगिरीसह टोकियो ऑलंपिकमध्ये(Tokyo Olympics) कांस्यपदक(Bronze Medal) जिंकले आहे.आज झालेल्या सामन्यात 69 किलो वेल्टरवेट प्रकाराच्या उपांत्य फेरीत, लोव्हलिनाचा तुर्कीच्या जागतिक नंबर एक बॉक्सर बुसेनाझ सुरमेनेलीने (Busenaz Sürmeneli) 5-0 ने पराभव केला आहे.यासह, आता लोव्हलिना बोर्गोहेन ऑलंपिक बॉक्सिंग स्पर्धेत पदक जिंकणारी तिसरी भारतीय बॉक्सर बनली आहे.(Tokyo Olympics: Indian boxer Lovlina Borgohain wins bronze medal)
यापूर्वी विजेंदर सिंग आणि एमसीसी मेरी कॉमने ही कामगिरी केली आहे. बीजिंग ऑलंपिक 2008 च्या मिडलवेट प्रकारात विजेंदर सिंगने प्रथम कांस्यपदक जिंकले. 2012 लंडन ऑलंपिकमध्ये MCC मेरी कॉमने फ्लायवेट प्रकारात कांस्यपदक जिंकले.
तसेच या वर्षीच्या ऑलंपिक मध्येही भारताला तिसरे पदक मिळाले आहे. याअगोदर पहिल्यांदा वेटलिफ्टिंग मध्ये मीराबाई चानू हिने भारतासाठी सिल्वर तर
पी.व्ही.सिंधू हिने बॅडमिंटन मध्ये कांस्यपदक पटकावले आहे आणि आज लोव्हलिना बोर्गोहेनच्या विजयाने भारताच्या खात्यात तिसऱ्या पदकाची नोंद झाली आहे.
सामन्यात, लोव्हलिनाला पहिल्या आणि द्वितीय न्यायाधीशाने 26-26 दिले, तर उर्वरित तीन न्यायाधीशांनी 25-25 गुण दिले. त्याच वेळी, बुसेनाज सुरमेनेलीला पाच न्यायाधीशांनी 30-30 गुण दिले.
प्रथमच ऑलंपिकमध्ये सहभागी होणारी भारतीय बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (69 किलो) ने तिच्या ऑलिम्पिक मोहिमेची भव्य सुरुवात केली. 27 जुलै रोजी तिच्या पहिल्या सामन्यात, लोव्हलिनाने जर्मनीच्या अनुभवी नेडिन अपेट्झचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यानंतर शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत त्याने चायनीज तैपेईच्या नियन चिन चेनचा 4-1 असा पराभव केला. यासह, लोव्हलीनाने भारतासाठी पदक जिंकण्याची खात्री केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.