स्वातंत्र्य दिनी भारतीय ऑलिम्पिक संघाला पंतप्रधानांकडून निमंत्रण

पंतप्रधान मोदी भारतीय ऑलिम्पिक संघाला वैयक्तिकरित्या भेटणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहे
भारतीय ऑलिम्पिक संघ
भारतीय ऑलिम्पिक संघDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : दरम्यान येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला (Independence day) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक (Olympics) तुकडीला विशेष अतिथी म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित करणार आहेत. भारतीय पुरुष हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जियमविरुद्ध 2-5 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. (On 15th August, Prime Minister Narendra Modi will invite the entire Indian Olympic team)

भारतीय ऑलिम्पिक संघ
IND vs ENG: मयंकच्या दुखापतीनंतर सलामीसाठी भारताकडे 'हे' तीन पर्याय

भारतीय पुरुष संघ आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे. या पराभवामुळे भारतीय पुरुष हॉकी संघासह कोट्यवधी भारतीय क्रीडा चाहत्यांची स्वप्न भंगले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाला प्रोत्साहन देताना ट्विट केले की विजय आणि पराभव हा जीवनाचा एक भाग आहे. आमच्या पुरुष हॉकी संघाने सर्वोत्तम कामगिरी केली.

दरम्यान येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक तुकडीला विशेष अतिथी म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी वैयक्तिकरित्या सर्वांना भेटणार असून त्यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली माध्यमांकडून मिळाला आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघ
Indian men's hockey team: वडिलांनी गाय विकून घडविले,आता बनलाय भारताची भिंत

पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले की, 'विजय आणि पराजय हा जीवनाचा भाग आहे. आमच्या भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. भारतीय संघाला पुढील सामन्यासाठी आणि भविष्यासाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंचा अभिमान आहे. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत बेल्जियमविरुद्ध 2-2 अशी बरोबरी होती. चौथ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमच्या धमाकेदार गोल नंतर भारतीय संघाकडे उत्तर नव्हते. बेल्जियमच्या विजयाचा नायक अलेक्झांड्रे हेंड्रिक्स होता, ज्याने या सामन्यात एकूण तीन गोल केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com