shardul and Mitali Dainik Gomantak
क्रीडा

Indian cricketer wedding : 'हा' भारतीय क्रिकेटपटु अडकणार लग्नबंधनात

उद्योजिका मिताली पारुलकर हिच्यासोबत पुढील वर्षी होणार विवाहबद्द

गोमन्तक डिजिटल टीम

मध्यमगतीची गोलंदाजी करणारा भारतीय क्रिकेटपटू आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या क्रिकेटपटूची होणारी बायको उद्योजिका आहे. त्यांचा साखरपुडा 2021 मध्ये झाला होता. दोन्ही वधू वर पुढच्या वर्षी २७ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. वधूने गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरवले होते पण लॉजिस्टिक्स आणि काही कारणास्तव लग्नाचे ठिकाण बदलण्यात आले. काही दिवसांपूर्वी भारताचा ओपनर केएल राहुल आणि अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीचे लग्न जानेवारी 2023 मध्ये असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

महाराष्ट्रातील पालघर येथे जन्मलेला भारतीय क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर उद्योजिका मिताली पारुलकर हिच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दोघांचा साखरपुडा 2021 मध्ये झाला होता. लग्नाच्या या वृत्ताला वधू मिताली हिने दुजोरा दिला आहे. याबाबतचे वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिले आहे. लग्नाआधीचे कार्यक्रम हे 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. शार्दुलचे वेळापत्रक व्यस्त आहे. तो 24 फेब्रुवारीपर्यंत खेळत आहे आणि तो 25 फेब्रुवारीपासुन तो कार्यक्रमांमध्ये सामील होउ शकणार आहे. शार्दुल व्यस्त असल्यामुळे मी पदभार स्वीकारला आहे. लग्नाला आम्ही जवळपास 200 ते 250 पाहुणे येण्याची अपेक्षा करत आहोत असे मितालीने सांगितले.

ती पुढे म्हणाली, कुटुंब आणि मित्रांसोबत हे लग्न मुंबईच्या बाहेर कर्जतमध्ये होणार आहे. सुरुवातीला, आम्हाला गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं, पण लॉजिस्टिक्स आणि इतर गोष्टी पाहता, ते खूप कठीण झालं असतं असं तिने सांगितले. मिताली पारुलकर कर्जत येथील स्थळाची पाहणी करण्यासाठी जात होत्या. शार्दुल ठाकूर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळतो. आयपीएल 2022 मध्ये शार्दुल दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळला होता. तर 2023 हंगामात तो कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळणार आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे मितालीचा जन्म झाला. ती "ऑल द जॅझ - लक्झरी बेकर्स" या नावाने ओळखल्या जाणार्‍या बेकरीची संस्थापक आहे. जो जगभरातील उत्कृष्ट पदार्थांची विक्री करणारा एक प्रमुख बेकरी ब्रँड आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT