Khanewal Cricket Stadium in Pakistan has been taken over by farmers Dainik Gomantak
क्रीडा

पाकिस्तानात 'क्रिकेट'ला उतरती कळा; स्टेडीयममध्ये पिकतेय शेती

Khanewal Stadium शेतकऱ्यांनी ताब्यात घेतले असुन, या स्टेडियममध्ये आता भोपळा, मिरची आणि भाज्या पिकवल्या जाता आहेत.

दैनिक गोमन्तक

Pakistan: मागच्या काही वर्षांत पाकिस्तानमधील क्रिकेटचे (Pakistan Cricket) प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होताना दिसते आहे. एकेकाळी ज्या देशात क्रिकट मोठ्या प्रमाणात खेळले जात होते, आता तो क्रिकेट संबंधीतच्या अगदी मूलभूत गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसतो आहे. मात्र पाकिस्तानी क्रिकेट अचानक चर्चेचा विषय का बनला असा प्रश्न जर आपल्याला पडला असेल, तर त्याचे कारण आहे क्रिकेट स्टेडियमचा व्हायरल होत असणारा एक व्हिडिओ. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील खानवाल स्टेडियम (Khanewal Stadium) दिसते आहे, ज्यामध्ये काही धक्कादायक दृष्य दिसता आहेत. या स्टेडीयममध्ये चक्क भोपळा आणि मिरचीच्या शेती सुरु असल्याचे पहायला मिळते आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मपंजाब प्रांतातील खानवाल स्टेडीयममध्ये देशांतर्गत सामने आयोजित करण्यात येणार होते. पाकिस्तानमधील तळागाळातील खेळाडूंचा विकास लक्षात घेऊन हे स्टेडियम बांधण्यात आले आहे. स्टेडियम उच्च श्रेणीच्या सुविधांनी सुसज्ज होते, त्यामध्ये सराव क्षेत्र आणि पवेलियनचा समावेश आहे.

मात्र, आता हे मैदान शेतकऱ्यांनी ताब्यात घेतले आहे, या स्टेडियममध्ये आता भोपळा, मिरची आणि भाज्या पिकवल्या जाता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्टेडियम खानवाल जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत येते, प्रशासनाने हे मैदान बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते.

दरम्यान, पाकिस्तान देशात पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने सुरू करण्याची तयारी करताना दिसतो आहे. सप्टेंबरमध्ये व्हाईट बॉल टेस्टसाठी न्यूझीलंड पाकिस्तानचा दौरा करणार आहे, तर पुढे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ऑक्टोबर आणि फेब्रुवारीमध्ये पाकिस्तान दौरा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. 2009 मध्ये श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवाद्यांच्या गटाने हल्ला केल्यामुळे 2009 पासुन पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT