आयपीएल (IPL 2022) च्या 8व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज एकमेकांशी भिडतील. दोन्ही संघांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आपला दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून गमावला. 128 धावा करुनही केकेआरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव स्वीकारावा लागला. तर, दुसरीकडे पंजाब किंग्जने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) पराभव केला. 206 धावांचे लक्ष्य असतानाही पंजाब किंग्जने एक षटक आधी जिंकले होते. अशा परिस्थितीत आता कोलकाताची गोलंदाजी आणि पंजाबची फलंदाजी (KKR vs PBKS) यांच्यात थेट स्पर्धा होणार आहे.
दरम्यान, दोन्ही संघांमध्ये कोण आहे वरचढ? आकड्यात कोण पुढे? पंजाबने किती सामने जिंकले आणि कोलकाता नाईट रायडर्सने किती सामने जिंकले? गेल्या दोन आयपीएल हंगामात या दोघांमध्ये कसा सामना झाला? या प्रश्नांची पुढील उत्तरे माहित आहेत का?
कोलकाताचे पारडे जड
कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. यामध्ये कोलकाताने 19 सामने जिंकले आहेत, तर पंजाबने केवळ 10 सामने जिंकले आहेत. अर्थात कोलकाताने जवळपास दुपटीने विजय मिळवला आहे.
गेल्या 4 सामन्यात काय घडले?
आकडेवारीत पंजाब किंग्जवर कोलकाता नाईट रायडर्सचा वरचष्मा असला, तरी गेल्या चार सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये बरोबरीची स्पर्धा आहे. पंजाब आणि कोलकाता या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. गेल्या मोसमात, कोलकाता आणि पंजाबने 1-1 ने सामना जिंकला आणि आयपीएल 2020 मध्ये देखील दोन्ही संघांमध्ये समान स्पर्धा होती.
कोलकाता नाईट रायडर्स : अभिजित तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर (Captain), अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक दार, शिवम मावी, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन.
पंजाब किंग्स : मयंक अग्रवाल ( Captain), शिखर धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, हृतिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे, बेनी हॉवेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.