Mumbai Indians
Mumbai IndiansDainik Gomantak

IPL 2022: मुंबईचा 'सूर्या' पुन्हा संघात सामील, RR ला देणार टक्कर!

सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) त्याचा विलीगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे.
Published on

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव बोटाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर गुरुवारी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुरुवारी सांगितले की, ''सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) त्याचा विलीगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेदरम्यान बोटाला दुखापत झाल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगळुरुमध्ये दाखल झाला होता. त्यामुळे 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्सकडून सीझनच्या पहिल्या IPL सामन्यात खेळू शकला नव्हता.'' (Suryakumar Yadav has returned to the Mumbai Indians squad)

दरम्यान, फ्रँचायजीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, 'सूर्यकुमार यादव त्याच्या अनिवार्य क्वारंटाईनमधून बाहेर आला आहे. त्यानंतर त्याने थेट सहकारी खेळाडू किरॉन पोलार्ड, इशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांच्याबरोबर सराव सत्रात सहभागीही झाला आहे. त्यामुळे त्याच्या येण्यानं संघात नवचैतन्य आलं आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सूर्या संघासोबत नसताना अनमोलप्रीत सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते. मात्र त्याच्या जागी सूर्याचे संघात सामील होणे जवळपास निश्चित झाले आहे.

Mumbai Indians
IPL 2022: बाबर आझम आयपीएलमध्ये असता तर...,शोएब अख्तरला ऐकून थक्क व्हाल!

पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला होता

27 मार्च रोजी झालेल्या सामन्यात दिल्लीने मुंबईचा चार विकेटने पराभव केला होता. 178 धावांचा पाठलाग करताना मुंबईला अपयश आले होते. अक्षर पटेल आणि ललित यादव यांच्यात सातव्या विकेटसाठी झालेल्या 75 धावांच्या भागीदारीने दिल्लीला विजय मिळवून दिला. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनीही शानदार कामगिरी केली. परंतु त्यांच्या गोलंदाजीने निराशा केली. जसप्रीत बुमराहच्या 3.2 षटकात 43 धावा झाल्या. याचा फटका मुंबईला सहन करावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com