India Dainik Gomantak
क्रीडा

Women’s World Cup 2022: भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिज चा रोखला 'विजयी रथ'

आयसीसी महिला विश्वचषक 2022 (Women’s World Cup 2022) मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा विजय रथ रोखला आहे.

दैनिक गोमन्तक

आयसीसी महिला विश्वचषक 2022 मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा विजय रथ रोखला आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 155 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. भारताचा 3 सामन्यातील हा दुसरा विजय आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजचाही (West Indies) तितक्याच सामन्यांमध्ये पहिला पराभव झाला. भारताच्या विजयात स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) शतकांचा महत्त्वाचा वाटा आहे. दोघींमधील 184 धावांच्या भागीदारीमुळे भारताने प्रथम विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. त्यानंतर मात्र वेस्ट इंडिजचा पराभव झाला. (The Indian womens team defeated the West Indies in the Women's World Cup 2022)

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय महिला खेळाडूंनी 50 षटकांत 8 गडी गमावून 317 धावा केल्या. प्रत्युत्तरात 318 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 162 धावांतच सर्वबाद झाला. सलामीच्या जोडीतील शतकी भागीदारीनंतर संघाने (Men and women) केलेली ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 161 धावांत ऑलआऊट होण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे.

स्मृती आणि हरमन यांच्या जोरावर भारत जिंकला

भारताच्या विजयात संपूर्ण संघाने मेहनत दाखवली असली तरी सर्वात मोठी भूमिका स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांनी बजावली आहे. मंधानाने 119 चेंडूत 123 धावा केल्या. तर हरमनने 107 चेंडूत 109 धावांची खेळी केली. या दोघींनी मिळून संघाच्या धावफलकात 184 धावांची भर घातली आहे. आणि, संघाची धावसंख्या 317 धावांपर्यंत नेण्यात मदत केली. महिला विश्वचषकात भारताचा हा पहिला 300 पेक्षा जास्त स्कोअर होता.

सलामीवीरांनी 101 धावा केल्या, उर्वरित 9 फलंदाज 61 धावांवर गारद झाले

आता जेव्हा वेस्ट इंडिजने विश्वचषकात भारताच्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली. डॉटिन आणि मॅथ्यूजने मिळून 101 धावांची सलामी दिली. यादरम्यान डॉटिननेही अर्धशतक झळकावले. परंतु, त्यानंतर उर्वरित 9 फलंदाज अवघ्या 61 धावांत गारद झाले. आणि, भारताने हा सामना 155 धावांनी जिंकला.

शिवाय, भारतीय गोलंदाजांमध्ये स्नेह राणा आणि मेघना सिंग यांनी वेस्ट इंडिजला 162 धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघींनी मिळून 5 बळी घेतले. स्नेहने 3 तर मेघनाने 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय झुलन, राजेश्वरी आणि पूजाने 1-1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT