आयसीसी (ICC) महिला विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात एक ओव्हरमध्ये 7 चेंडू टाकण्यात आले. साधारणपणे एका षटकात 6 पेक्षा जास्त चेंडू टाकले जातात तेव्हा गोलंदाज वाइड किंवा नो बॉल टाकतो. परंतु या ओव्हरमध्ये तसं काही घडलंच नाही. गोलंदाजाने 6 चेंडू टाकले, असे असूनही 7 वा चेंडू टाकावा लागला. आता ही चूक होती. परंतु आयसीसी स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या संघांसाठी हे योग्य लक्षण नाही. अतिरिक्त चेंडूवर काढलेल्या धावांचा फटका त्यांना सहन करावा लागू शकतो. (In The Match Between Pakistan And South Africa 7 Balls Were Bowled In One Over)
दरम्यान, 27 व्या षटकात पाकिस्तान (Pakistan) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील सामन्यात हे दिसून आले. दक्षिण आफ्रिका संघ फलंदाजी करत होता. आणि गोलंदाजीवर पाकिस्तानची ओमामा सोहेल होती. या षटकात तिने 7 धावा दिल्या. आणि, नंतर 8 वी धाव दक्षिण आफ्रिकेने त्या एका अतिरिक्त चेंडूवर घेतली, जो गोलंदाजाने अतिरिक्त चेंडू टाकला होता.
अतिरिक्त चेंडू!
क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्त्वाची असते. एका धावसंख्येने अनेकवेळा संघाना पराभवाचा सामनाही करावा लागला. एका चेंडूने सामन्याचा चेहरा मोहराही बदलतो. त्यातच आयसीसीसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्याचे महत्त्व आणखी वाढते. विशेषत: जेव्हा संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक असतो. पाकिस्तानचा संघ आयसीसी महिला विश्वचषक 2022 मध्ये पहिल्या विजयासाठी झगडत आहे. कारण भारत (India) आणि ऑस्ट्रेलियाकडून (Australia) शेवटचे दोन सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत त्या एका चेंडूने किंवा धाव संख्येने सामन्याच्या निकालात फरक पडला तर जबाबदार कोण?
पाकिस्तानसाठी विजय आवश्यक
पाकिस्तानच्या संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला तर त्यांच्यापुढील अडचणी वाढतील. कारण त्यांचा स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव असेल. दुसरीकडे, दक्षिण त्यांच्या दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा लढो किंवा मरो चा सामना असतो तेव्हा प्रत्येक चेंडू संघांसाठी मौल्यवान असतो. अशा स्थितीत षटकात अतिरिक्त चेंडू टाकणे ही पंचाची चूक ठरु शकते. परंतु त्याचा फटका संघाला सहन करावा लागू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.