

पणजी: महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ‘तहलका’चे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांच्या २०२१ मधील निर्दोष मुक्ततेविरोधात गोवा सरकारने दाखल केलेल्या अपिलावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला आहे.
सुनावणीदरम्यान तेजपाल यांचे ज्येष्ठ ॲड. आबाद पोंडा यांनी गोवा पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवले. पहिल्या मजल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासादरम्यान पाहूनही ते न्यायालयात का सादर केले गेले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, कथित घटनेनंतर तक्रारदार महिलेचे वर्तन सामान्य होते आणि ती कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाली होती, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. पुराव्यांची ‘हॅश व्हॅल्यू’ जनरेट न करणे आणि ‘डीव्हीआर’ तपासणीस आक्षेप घेणे यामुळे सरकारी पक्षाचा दावा वस्तुनिष्ठ पुराव्यांवर टिकत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
दुसऱ्या बाजूला, सरकारी पक्षाने जोरदार युक्तिवाद करताना स्पष्ट केले की ही घटना खरोखरच घडली आहे. पोलिसांनी सादर केलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध दस्तऐवज हे घटनेचे गांभीर्य स्पष्ट करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.