Goa Western Ghats Eco Sensitive Zone: गोवा जैवसंवेदनशील क्षेत्रातून 22 गावे वगळण्याचा प्रस्ताव कमकुवत? केंद्राकडून अतिरिक्त माहितीची मागणी

22 Villages Exclusion Proposal Goa: पश्चिम घाट जैवसंवेदनशील क्षेत्रातून गोव्यातील २२ गावे वगळण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्ताव फारच कमकुवत झाल्याचे प्रशासकीय वर्तुळात मानले जात आहे.
22 Villages Exclusion Proposal Goa
Goa Western Ghats Eco Sensitive ZoneDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पश्चिम घाट जैवसंवेदनशील क्षेत्रातून गोव्यातील २२ गावे वगळण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्ताव फारच कमकुवत झाल्याचे प्रशासकीय वर्तुळात मानले जात आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारने डॉ. देवेंद्र पांडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अभ्यास समितीचा अहवाल आणि त्यावरील शिफारशी तातडीने स्वीकारण्याऐवजी केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने स्वतंत्रपणे अतिरिक्त माहिती मागवली होती, याकडे प्रशासकीय पातळीवरून अंगुलीनिर्देश केला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्याच्या मांडणीला केंद्राने पुरेसे महत्त्व दिले नसल्याचे चित्र यातून स्पष्ट झाले आहे. ३१ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या मसुदा अधिसूचनेत गोव्यातील १०८ गावे पश्चिम घाट जैवसंवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली होती. त्यावर आक्षेप घेत राज्य सरकारने २२ गावे या यादीतून वगळण्याची मागणी केली होती.

22 Villages Exclusion Proposal Goa
Goa ECO Sensitive Zone: गोवा सरकारला केंद्राचा मोठा झटका! 21 गावे वगळण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती अमान्य; 108 गावांवर 'जैवसंवेदनशील'ची टांगती तलवार

या मागणीला शास्त्रीय आधार देण्यासाठी भारतीय वन सर्वेक्षण संस्थेचे माजी महासंचालक डॉ. देवेंद्र पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालाच्या आधारेच केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

या अहवालावर समाधान न मानता केंद्र सरकारने १०८ गावांची गावनिहाय वनक्षेत्र नसलेली जमीन, नोंदणीकृत व खासगी वनक्षेत्र, तसेच वन आणि वृक्षाच्छादनाची अद्ययावत माहिती मागवली होती. ही माहितीही राज्य सरकारने पुरवली होती. त्यानंतरही राज्याच्या प्रस्तावाचा विचार केंद्र सरकारने केला नाही. यामुळे पुरेशा तथ्याधारित माहितीशिवाय प्रस्ताव सादर करण्यात आल्याची शक्यता केंद्रीय मंत्रालयाने गृहित धरली असावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com