ICC Womens World Cup 2022: स्मृती मंधाना अन् हरमनप्रीत कौर ने रचला इतिहास

भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC महिला विश्वचषक 2022 (ICC Womens World Cup 2022) मधील त्यांच्या तिसऱ्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध अफलातून फलंदाजी केली.
Smriti Mandhana And Harmanpreet Kaur
Smriti Mandhana And Harmanpreet KaurTwitter/ @WisdenIndia
Published on
Updated on

ICC womens world cup 2022: भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC महिला विश्वचषक 2022 मधील त्यांच्या तिसऱ्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध अफलातून फलंदाजी केली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी विशेषतः स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांनी अप्रतिम फलंदाजी करत संघाची धावसंख्या 300 च्या पुढे नेली. आपल्या फलंदाजीच्या जोरावर या दोघींनी महिला विश्वचषकात भारतासाठी दोन मोठे विक्रमही केले. या सामन्यात भारतीय महिला संघानेही शानदार कामगिरी करत महिला विश्वचषकातील आपली सर्वात मोठी धावसंख्या उभारली. (Smriti Mandhana and Harmanpreet Kaur made history setting two big records in a single match)

चौथ्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मंधाना आणि हरमनप्रीतच्या नावावर

स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) चौथ्या विकेटसाठी 184 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान हरमनप्रीत कौरने 86 चेंडूत 80 धावा केल्या तर स्मृती मंधानाने 88 चेंडूत 100 धावा केल्या. त्याचवेळी दोघींनी 174 चेंडूत 184 धावा केल्या. महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासातील चौथ्या विकेटसाठी ही सर्वोच्च भागीदारी ठरली.

Smriti Mandhana And Harmanpreet Kaur
ICC Women's World Cup 2022 साठी टीम इंडियाची घोषणा !

महिला विश्वचषकाच्या एका सामन्यात भारताच्या दोन फलंदाजांनी प्रथमच दोन शतके झळकावली

भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 50 षटकांत 8 बाद 317 धावा केल्या. तर दुसरीकडे स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौरने संघाला सर्वोच्च धावसंख्येपर्यंत नेण्यात मोलाचा वाटा उचलला. दोघांनीही शतके झळकावली ज्यात मंधानाने 119 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 123 धावा केल्या तर हरमनप्रीत कौरने 107 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. भारताकडून महिला विश्वचषकाच्या कोणत्याही सामन्यात प्रथमच दोन महिला खेळाडूंनी शतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com