Goa Chess Association Dainik Gomantak
क्रीडा

विनय तेंडुलकर गटाला मोठा दणका!

नैतिकता आयोगाने गोवा (Goa) बुद्धिबळ संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवत पदाधिकारी पदासाठी मतदान घेण्याचा आदेश दिला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या (All India Chess Federation) नैतिकता आयोगाने गोवा (Goa) बुद्धिबळ संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवत पदाधिकारी पदासाठी मतदान घेण्याचा आदेश दिला आहे. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर (Vinay Tendulkar) यांच्या गटाला हा दणका मानला जातो.

नवी दिल्लीस्थित (New Delhi) नैतिकता आयोगाने गोवा बुद्धिबळ संघटना निवडणुकीतील चार उमेदवार महेश कांदोळकर, आशेष केणी, विश्वास पिळर्णकर, अमोघ नमशीकर यांच्या तक्रारीची दखल घेत हा निर्णय दिला आहे. गोवा बुद्धिबळ संघटना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने या चौघाचे उमेदवारी अर्ज फेटाळत निवडणूक बिनविरोध घोषित केली होती. त्याविरोधात चौघाही उमेदवारांनी महासंघाच्या नैतिकता आयोगाकडे दाद मागिदली होती. याप्रकरणी नैतिकता आयोगाने 16 ऑक्टोबर रोजी सुनावणी पूर्ण करून 19 ऑक्टोबरला आदेश जारी केला. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी व उप निवडणूक निर्णय अधिकारी यांना नैतिकता आयोगाने जारी केलेल्या आदेशाच्या तारखेपासून दोन आठवड्यात गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीतील पदाधिकाऱ्यांच्या जागेसाठी तक्रार केलेल्या उमेदवारांसह मतदान घेण्याचे बजावले असल्याचे माहिती तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार आणि गोवा

बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी बिनविरोध ठरलेले अरविंद म्हामल यांनी दिली. ‘‘अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचा आदेश हा महेश कांदोळकर यांच्या नेतृत्वाखालील गटाचा मोठा विजय आहे. एकसंध राहिलेल्या पेडणे, बार्देश, डिचोली, सत्तरी, तिसवाडी, फोंडा, सासष्टी या सातही तालुक्यांचाही हा नैतिक विजय आहे,’’ अशी प्रतिक्रिया अरविंद म्हामल यांनी दिली.

थोडक्यात पार्श्वभूमी

बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेस पाच ऑगस्ट रोजी अरविंद म्हामल (उपाध्यक्ष, उत्तर गोवा), सत्यवान हरमलकर (उपाध्यक्ष, उत्तर गोवा), तुकाराम शेट्ये (संयुक्त सचिव, उत्तर गोवा) व कालिदास हरवळकर (संयुक्त सचिव, उत्तर गोवा) हे चार उमेदवार बिनविरोध ठरले होते. छाननीनंतर 22 ऑगस्ट रोजी नियोजित असलेल्या निवडणुकीसाठी अध्यक्ष, सचिव, खजिनदार, संयुक्त खजिनदार, उपाध्यक्ष दक्षिण गोवा व संयुक्त सचिव दक्षिण गोवा या पदासाठी मतदान होणार होते, पण 10 ऑगस्ट रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने काही उमेदवारांचे अर्ज फेटाळत निवडणूक बिनविरोध जाहीर केली, त्यास 22 ऑगस्टच्या आमसभेत मान्यता मिळाल्याचेही जाहीर करण्यात आले होते. निवडणुकीत अध्यक्षपदासाठी भाजपा नेते राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्यासमोर महेश कांदोळकर यांचे आव्हान होते, तसेच सचिवपदासाठी आशेष केणी व शरेंद्र नाईक यांच्यात, तर खजिनदारपदासाठी किशोर बांदेकर व विश्वास पिळर्णकर यांच्यात थेट लढत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT