Mahendra Singh Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

धोनीच्या IPL प्रोमोवरुन उडाला गोंधळ, ASCI ने जाहिरात हटवण्याचे दिले निर्देश

महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) सध्या त्याच्या नवीन IPL (IPL 2022) जाहिरातीमुळे अडचणीत आला आहे.

दैनिक गोमन्तक

महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) सध्या त्याच्या नवीन IPL (IPL 2022) जाहिरातीमुळे अडचणीत आला आहे. धोनीबाबत अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर ही जाहिरात काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. IPL 2022 26 मार्चपासून सुरु झाले. लीग सुरु होण्यापूर्वी या जाहिरातीच्या मदतीने प्रमोशन केले जात होते. ही जाहिरात सामन्यांच्या वेळीही दाखवली जात होती, मात्र आता ASCI च्या आदेशानंतर ती काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंझ्युमर युनिटी अँड ट्रेस सोसायटीने (CUTS) या जाहिरातीविरोधात तक्रार दाखल केली होती. या जाहिरातीद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन ही चांगली बाब असल्याचे दाखवले जात आहे, जे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. एएससीआयनेही याला सहमती दर्शवली असून यामुळेच त्यांनी एड काढून टाकण्याची मागणी केली आहे. (The Advertising Standards Council of India has asked to change or remove the advertisement made by Mahendra Singh Dhoni)

जाहिरात बंदी

जाहिरातीत धोनीला (Mahendra Singh Dhoni) बस ड्रायव्हर म्हणून दाखवण्यात आले आहे. तो रहदारीने भरलेल्या रस्त्याच्या मधोमध बस थांबवतो. एक ट्रॅफिक पोलिस अधिकारी त्याच्याकडे येतो जो त्याला असे करु नका असे सांगतो. तेव्हा धोनी त्यांना उत्तर देताना म्हणतो की, मी आयपीएलची सुपर ओव्हर पाहत आहे. यानंतर पोलीस तेथून निघून जातो. तक्रारीनंतर कंज्यूमर कंपलेट्स कमेटीने ही जाहिरात कंपनीच्या अधिकाऱ्यासह पाहिली. त्यानंतर त्यांनी तक्रारदारांच्या मताशी सहमती दर्शवली आणि कंपनीला 20 एप्रिलपर्यंत जाहिरात बदलण्यास किंवा काढून टाकण्यास सांगितले. कंपनीने हे लेखी स्वीकारले असून जाहिरात काढून टाकणार असल्याचे म्हटले आहे.

आयपीएल नव्या अवतारात दिसत आहे

तब्बल दोन वर्षांनंतर आयपीएलचे आयोजन भारतात होत आहे. चाहत्यांनाही स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळेच यावेळी चाहत्यांचा आयपीएलबद्दलचा उत्साह एका वेगळ्याच शिगेला पोहोचला आहे. यावेळी आठ नाही तर 10 संघ या लीगमध्ये सहभागी झालेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

SCROLL FOR NEXT