IPL 2022: 'डेव्हिड वॉर्नरला आता आयपीएलमध्ये कोणीही कर्णधार बनवणार नाही'

भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने सांगितले की, वॉर्नरला (David Warner) निश्चितपणे बोलावले जाईल, मात्र त्याला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी मिळेल, हे अवघड आहे.
David Warner
David WarnerDainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल 2022 मेगा लिलावात ज्या खेळाडूंना मोठी बोली लागण्याची शक्यता आहे, त्यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरचाही समावेश आहे. सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) मागील हंगाम निराशाजनक होता. आधी त्याला हंगामाच्या मध्यावर कर्णधारपदावरुन हटविण्यात आले आणि नंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान देण्यात आले नाही. संघाने त्याला सोडले. यानंतर वॉर्नरने उघडपणे सांगितले की, हैदराबाद संघात मला चांगली वागणूक दिली जात नव्हती. वॉर्नर आता नव्या संघाच्या शोधात आहे. (It Is Difficult For David Warner To Get The Captaincy Again In The IPL)

दरम्यान, आयपीएल 2022 (IPL 2022) साठी लिलावाची मेगा इव्हेंट 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ज्यामध्ये 10 संघ आपापल्या पथकांसाठी बोली लावतील. डेव्हिड वॉर्नर 2022 हंगामातील मेगा लिलाव पूलचा भाग आहे. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने सांगितले की, वॉर्नरला निश्चितपणे बोलावले जाईल, मात्र त्याला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी मिळेल, हे अवघड आहे. तीन फ्रँचायझी कर्णधाराच्या शोधात आहेत, ज्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांचा समावेश आहे.

वॉर्नरला कर्णधारपद मिळणार नाही

आकाश चोप्रा (Aakash Chopra) म्हणाला, 'आरसीबी डेव्हिड वॉर्नरला घेऊ शकते, पण मला वाटते आरसीबी त्याला कर्णधार बनवणार नाही. डेव्हिड वॉर्नर कोणत्याही संघाचा कर्णधार होणार नाही, असे मला वाटते. पंजाब सोडला तरी दोन संघ कर्णधाराच्या शोधात आहेत. तो नक्कीच कोणत्या ना कोणत्या संघात जाईल. तो खूप महाग असेल पण कोणताही संघ त्याला कर्णधार बनवणार नाही, माझा विश्वास आहे कारण आयपीएल हे एक लहान कुटुंब आहे, प्रत्येकाला कल्पना आहे की गेल्या वर्षी काय झाले होते.

आरसीबी वॉर्नरवर बोली लावू शकते

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, वॉर्नर हा आरसीबीसाठी चांगला पर्याय असेल. तो पुढे म्हणाला, 'तो नक्कीच कोणत्या ना कोणत्या संघात असणार आहे. तो आरसीबीकडे जाऊ शकतो. एकीकडे विराट कोहली (Virat Kohli) आणि दुसरीकडे डेव्हिड वॉर्नर संघाची कमान संभाळतील. दोघेही स्फोटक फलंदाज आहेत. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला यावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com