Team Indias Chak de India forecast in South Africa

 

Dainik Gomantak 

क्रीडा

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाचा ‘चक दे इंडिया’ वाला अंदाज

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघ खूप चर्चेत आहे. कसोटी कर्णधार विराट कोहलीला वनडेतून वगळल्यानंतर बरेच काही घडले आहे. बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि कॅप्टन कोहली यांच्यातील वक्तव्यावरुन हे प्रकरण चांगलेच तापले आहे. या सर्व गोष्टींमध्ये भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत (South Africa) पोहोचला आहे. संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही बाकीच्या सहकारी खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसत आहेत.

दरम्यान, टीम इंडियाचे (Team India) नवे प्रशिक्षक आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. द्रविडने संघाची कमान हाती घेतल्यानंतर भारतीय संघ प्रथमच भारताबाहेर खेळायला जात आहे. न्यूझीलंडनंतर (New Zealand) द्रविडच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाची ही दुसरी मालिका आहे. दौऱ्यावर आलेल्या संघाला पहिला सामना जोहान्सबर्गमध्ये खेळायचा आहे. 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू मस्ती करताना दिसत आहेत.

तसेच, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू हॉटेलमध्ये मस्ती करताना दिसले. इथे संघाच्या उर्वरित खेळाडूंसह कर्णधार आणि प्रशिक्षकही यात सामील झाले. एका बाजूला प्रशिक्षक द्रविड आणि दुसऱ्या बाजूला कर्णधार कोहली. कोचच्या शॉटवर कॅप्टन कोहली हाय फाईव्ह देताना दिसला.

शिवाय, दोघांमधील ही कॉमेंट्री पाहून भारतीय चाहत्यांना हायसे वाटले. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी कर्णधार कोहलीने एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदावरुन हटवण्याबाबत गांगुलीचे विधान खोटे ठरवल्याने प्रकरण तापले होते. द्रविडच्या टीम इंडियात आगमनानंतर झालेल्या बदलामुळे लोक संघातील वातावरणाबद्दल बोलू लागले. बीसीसीआयने जारी केलेल्या सरावाच्या व्हिडीओने या वक्तव्यावर प्रत्येक प्रकारे मौन धारण केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT