Team India BCCI
क्रीडा

IND vs AUS T20: मालिकेत आघाडी घेण्यास टीम इंडिया प्रयत्नशील! तिरुवनंतपुरममध्ये 'सुर्या ब्रिगेड'चे जोरदार स्वागत

Video: ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळण्यासाठी तिरुवनंतरपुरमला पोहचलेल्या टीम इंडियाचे जोरदार स्वागत झाले.

Pranali Kodre

Team India reached Thiruvananthapuram for 2nd T20I against Australia:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणमला पार पडला होता. रोमांचक झालेला हा सामना भारताने 2 विकेट्सने जिंकला होता.

आता या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (26 नोव्हेंबर) तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ शुक्रवारी (24 नोव्हेंबर) तिरुवनंतपुरमला पोहचला आहे.

भारतीय संघ तिरुवनंतपुरमला पोहचल्यानंतरचा व्हिडिओ देखील बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की तिथे पोहचल्यानंतर भारतीय संघाचे जल्लोषात स्वागतही झाले आहे. विमानतळावरही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. वनडे वर्ल्डकपनंतर बीसीसीआयने अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. तसेच हार्दिक पंड्याही दुखापतग्रस्त असल्याने सूर्यकुमारकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यासाठी ऋतुराज गायकवाड उपकर्णधार असणार आहे.

दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना जिंकला असल्याने भारतीय संघ 5 सामन्यांच्या मालिकेच 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.

त्यामुळे आता दुसरा सामना जिंकून मालिकेतील आघाडी आणखी भक्कम करण्याची संधी भारताकडे असणार आहे. तसेच मॅथ्यू वेडच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.

दुसऱ्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया संघात बदल होऊ शकतात.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यासाठी काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. पण आता दुसऱ्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल, ऍडम झम्पा, ट्रेविस हेड अशा प्रमुख खेळाडूंचे संघात पुनरागमन होऊ शकते.

असे आहेत दोन्ही संघ -

  • भारतीय संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

    (श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यात उपकर्णधार असेल.)

  • ऑस्ट्रेलिया संघ - मॅथ्यू वेड (कर्णधार), ऍरॉन हार्डी, जेसन बेऱ्हेनडॉर्फ, सीन ऍबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रेविस हेडस जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, केन रिचर्डसन, ऍडम झम्पा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 'राफेल'मधून घेतली भरारी, पाकड्यांच्या दाव्याचीही पोलखोल; म्हणाल्या, 'हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव...' VIDEO

SCROLL FOR NEXT