Team India Jersey Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 साठी टीम इंडियाच्या जर्सीत काय झाले बदल? BCCI ने शेअर केला व्हिडिओ

Pranali Kodre

Team India Jersey for ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. चाहते आतुरतेने वाट पाहात असलेल्या 13 व्या वनडे वर्ल्डकपला 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरुवात होणार आहे. या वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे.

भारतीय संघाचे किट स्पॉन्सर आदिदासने व्हिडिओ रिलिज करत या जर्सीचे अनावरण केले आहे. भारताचा रॅप सिंगर रफ्तारने गायलेल्या 'तीन का ड्रीम' या गाण्यासह या जर्सीचे अनावरण करण्यात आले.

दरम्यान, या गाण्यावर बनवलेल्या व्हिडिओमध्ये काही चाहत्यांसह रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा, शुभमन गिल यांच्यासह भारतीय संघातील खेळाडू दिसत आहेत. या गाण्यातून चाहते आणि खेळाडू आता 1983 आणि 2011 नंतर भारतीय संघाच्या तिसऱ्या विश्वविजयाची प्रतिक्षा करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, वर्ल्डकप 2023 साठीच्या भारतीय संघाच्या जर्सीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

वनडे जर्सीमध्ये संघाच्या खांद्यावरील तीन पाढंऱ्या पट्ट्यांचा रंग बदलण्यात आला असून आता त्या पट्ट्यांना भारताच्या तिंरग्याचा रंग देण्यात आला आहे. तसेच डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो असून त्यावर दोन स्टार आहेत. हे स्टार भारताचे 1983 आणि 2011 सालच्या विश्वविजयाचे प्रतिक आहेत.

वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वाची 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून 27 सप्टेंबरला या मालिकेतील अखेरचा सामना खेळला जाणार आहे. ही वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वीची अखेरची मालिका असणार आहे. त्यामुळे वर्ल्डकप 2023 च्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

दहा संघात रंगणार थरार

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे 10 संघ खेळणार आहेत. हे सर्व 10 संघ साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यानंतर पहिले चार संघ उपांत्य फेरीत खेळतील, तर उपांत्य सामन्यातील विजेते संघ 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्यात भिडणार आहेत.

भारताचा वर्ल्डकप 2023 मधील पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध रंगणार आहे.

भारतीय संघाचे 2023 वर्ल्डकपसाठी वेळापत्रक

  • 8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 11 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

  • 14 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

  • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला

  • 29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, मुंबई

  • 5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 12 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, बंगळुरू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT