World Cup 2023 साठी अश्विनची होणार टीम इंडियात एन्ट्री? कॅप्टन रोहित शर्मानेच दिले महत्त्वाचे संकेत

Rohit Sharma: भारताचा कर्णधार रोहित शर्माने दुखापतग्रस्त खेळाडूंबद्दल अपडेट देण्याबरोबरच वर्ल्डकपच्या संघात बदलाचे संकेतही दिले आहेत.
R Ashwin | Rohit Sharma
R Ashwin | Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma gave update on injured Shreyas Iyer and Axar Patel ahead of World Cup 2023:

भारतीय संघाने रविवारी आशिया चषक 2023 स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभूत करत आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. या विजेतेपदानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने दुखापतग्रस्त खेळाडूंबद्दल अपडेट देण्याबरोबरच वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघात बदलाचे संकेतही दिले आहेत.

अक्षर पटेलच्या दुखापतीने वाढवले टेंशन

आशिया चषक सुरू असताना बांगलादेशविरुद्ध झालेल्या सुपर फोरच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला अंतिम सामना खेळता आला नव्हता. त्याच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरला निवडण्यात आले होते.

आता हाताला झालेल्या दुखापतीमुळे अक्षर 22 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या वनडे मालिकेतून बाहेर होण्याची दाट शक्यता आहे. तसेच 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप सुरू होणार आहे. या स्पर्धेतही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

त्याच्याबद्दल रोहित म्हणाला, 'सध्या तरी असे दिसत आहे की तो आठवड्यात किंवा 10 दिवसात बरा होईल. मला माहित नाही, आपल्याला तो दुखापतीतून कसा सावरतो, हे पाहावे लागेल. काही खेळाडू लवकर बरे होतात, मला आशा आहे की त्याच्याबाबतही तसेच असेल. मला खात्री नाही की तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात पहिले दोन सामने खेळणार की नाही, पण आपण प्रतिक्षा करू आणि पाहू.'

R Ashwin | Rohit Sharma
World Cup 2023 पूर्वी भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह संघांना सतावतेय दुखापतींची चिंता, डझनभर खेळाडू जखमी

अश्विनचे होणार पुनरागमन?

दरम्यान, अक्षरला दुखापत झालेली असतानाच रोहितने असेही संकेत दिले आहेत की अद्याप आर अश्विनसाठी वर्ल्डकपचे दरवाजे बंद झालेल नाहीत. 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची आधीच निवड झाली आहे. पण 28 सप्टेंबरपर्यंत संघात बदल केला जाऊ शकतो.

रोहितने अश्विनबद्दल भाष्य करताना वॉशिंग्टन सुंदरला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात अक्षर ऐवजी का संधी दिली याबद्दलही माहिती दिली.

रोहित म्हणाला, 'फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू म्हणून अश्विन शर्यतीत आहे. मी त्याच्याशी फोनवर बोलत आहे. अक्षरला ऐनवेळी दुखापत झाली. त्यावेळी वॉशिंग्टन उपलब्ध होता. त्यामुळे त्याला येऊन त्याची भूमिका निभवावी लागली. तो क्रिकेट-फिट होता कारण तो बंगळुरूमध्ये एशियन गेम्ससाठी निवडलेल्या संघाच्या शिबिरात होता. मी प्रत्येक खेळाडूला त्यांच्या भूमिकेबद्दल स्पष्ट सांगितले आहे.'

दरम्यान, अश्विनने यापूर्वी अखेरचा वनडे सामना 21 जानेवारी 2022 रोजी खेळला आहे. म्हणजेत जवळपास दीडवर्षे तो वनडे क्रिकेट खेळलेला नाही. पण आता त्याचे पुन्हा दीड वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते.

R Ashwin | Rohit Sharma
IND vs SL Final: अवघ्या सव्वा दोन तासांत श्रीलंकेचा 'खेळ' खल्लास अन् सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा सुळसुळाट

श्रेयस अय्यर झाला फिट?

दरम्यान, पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर श्रेयस अय्यरने आशिया चषकातून भारतीय संघात पुनरागमन केले होते. परंतु, त्याला दोन सामन्यांनंतर पुन्हा पाठीत वेदना जाणवल्याने तो खेळला नाही. पण तो 99 टक्के फिट असल्याची माहिती रोहितने दिली.

रोहित म्हणाला, 'श्रेयस अंतिम सामन्यासाठी उपलब्ध नव्हता, कारण त्याच्यासाठी ठरवलेले काही परिमाण पूर्ण व्हायचे होते. मला वाटते आज ते पूर्ण होतील. मी असे म्हणेल की तो 99 टक्के तंदुरुस्त झाला आहे.'

'तो आता चांगला दिसत आहे. त्याने बराच काळ फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केले आहे. आम्ही मैदानात येण्यापूर्वीच तो बराच काळ मैदानात होता. मला वाटत नाही की आमच्यासाठी काळजी करण्यासारखे काही आहे.'

दरम्यान आता श्रेयस आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिके खेळणार की नाही, हे पाहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com