'दिल जश्न बोले...', World Cup 2023 अँथम झाले लाँच, रणवीर सिंगसह सेलिब्रेटींचा परफॉर्मन्स

World Cup 2023 Anthem: 'वनडे एक्सप्रेसमध्ये चढण्यास सज्ज व्हा!' वर्ल्डकप 2023 चे अँथम आले समोर, बॉलिवूड स्टार्सने वेधलं लक्ष
World Cup 2023
World Cup 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

'Dil Jashn Bole!' Official ICC ODI Cricket World Cup 2023 Anthem:

भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आता दोनच आठवडे राहिले असताना अंतिम तयारीला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या स्पर्धेचे अँथम साँग प्रदर्शित केले आहे.

'दिल जश्न बोले...' असे अँथम साँगचे नाव असून हे अँथम चाहत्यांना वर्ल्डकपसाठी वनडे एक्सप्रेसमध्ये चढण्यास सज्ज व्हा असा संदेश देत आहे. या अँथम साँगमध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. तसेच त्याच्याबरोबर इतक काही सेलिब्रेटीही दिसत आहेत. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही देखील परफॉर्म करताना दिसत आहे.

'दिल जश्न बोले...' अँथमचे संगीत प्रीतम यांचे असून श्लोक लाल आणि सावेरी वर्मा गीतकार आहेत. प्रीतम, नकाश अझिझ, श्रीराम चंद्र, अमित मिश्रा आणि जोनिता गांधी हे गायत आहेत, तर यातील रॅप चरनचे आहे.

World Cup 2023
World Cup 2023 पूर्वी भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह संघांना सतावतेय दुखापतींची चिंता, डझनभर खेळाडू जखमी

या गाण्यात पारंपारिक भारतीय वादनाला आंतरराष्ट्रीय फ्लेवर देण्यात आला आहे, ज्यातून जगभरातील विविध संस्कृती, समुदाय, भावना आणि चाहत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे अँथम सध्या चांगलेच चर्चेत असून सर्वत्र प्रदर्शित झाले आहे.

बारा वर्षांनी भारतात वर्ल्डकप

भारतात यावर्षी होणारा वर्ल्डकप हा एकूण 13 वा वर्ल्डकप असणार आहे. पण असे असले तरी भारत पहिल्यांदाच स्वतंत्रपणे वर्ल्डकपचे आयोजन करणार आहे. याआधी भारतात 1987, 1996 आणि 2011 मध्ये वर्ल्डकपचे सामने झाले होते. पण त्यावेळी भारताने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासह संयुक्त यजमानपद भूषवले होते.

आता भारतात 5 ऑक्टोबरपासून 46 दिवसात 48 वर्ल्डकप सामने खेळवले जाणार आहेत. त्यापूर्वी 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान 10 सराव सामने खेळले जाणार आहेत. असे एकूण 58 सामने 12 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.

World Cup 2023
W,0,W,W,4,W...! सिराजच्या वेगाने लंकेची दाणादाण, भारतीय क्रिकेट इतिहासात कोरलं सुवर्णाक्षरांनी नाव

सराव सामने गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद या ठिकाणी रंगणार आहेत. त्यानंतर मुख्य स्पर्धेतील सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरात होणार आहेत. 

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे 10 संघ खेळणार आहेत. साखळी फेरीत हे सर्व 10 संघ आमने-सामने येणार आहेत.

पहिला सामना 5 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात रंगणार आहे. तसेच 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com