तालिबानने (Taliban) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Afghanistan Cricket Board) कार्यकारी संचालकाला (Executive Director) बडतर्फ केले आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Talibanचा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाबाबत मोठा निर्णय

आयपीएलमध्ये (IPL) दाखविण्यात येणारी काही दृष्ये आणि स्टेडियममध्ये महिलांची उपस्थिती या गोष्टी अफगाणिस्तानात (Afghanistan) 'इस्लामविरोधी असल्याने तेथे IPL प्रसारित होणार नाही. असे तालिबान सरकारकडून (Taliban government) सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Afghanistan Cricket Board) कार्यकारी संचालकाला (Executive Director) बडतर्फ केले आहे. हमीद शिनवारीने सोमवारी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केले असून, तालिबानचे नवे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी (Home Minister Sirajuddin Haqqani) यांचे धाकटे बंधू अनस हक्कानी (Anas Haqqani) यांनी त्यांना काढून टाकले आहे. त्यांच्या बडतर्फीचे कोणतेही कारण दिले गेले नाही, परंतु त्यांच्या जागी नसीबुल्लाह हक्कानी (Nasibullah Haqqani) यांची नियुक्ती केली जाईल असे त्यांनी स्पष्ट आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी यांचे नातेवाईक आहेत की नाही हे स्पष्ट नाही. तालिबानच्या 20 वर्षांच्या युद्धादरम्यान अमेरिकेच्या समर्थित सरकारांबरोबर काबूलवर झालेल्या अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यांच्या संदर्भात एफबीआयने हक्कानीला चौकशीसाठी बोलावले आहे. क्रिकेटसह महिलांना खेळांवर बंदी घालण्याच्या तालिबानच्या आदेशामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर संताप निर्माण झाला आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या खेळावरील बंदीच्या निषेधार्थ अफगाणिस्तान क्रिकेट संघासोबत एक कसोटी सामना रद्द करण्याची धमकी दिली होती. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत फेसबुक पेजने नसीबुल्लाह हक्कानीची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या चाहत्यांना या हंगामात टी-20 लीगला मुकावे लागेल. तालिबानच्या नवीन राजवटीने आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. आयपीएलमध्ये दाखविण्यात येणारी काही दृष्ये आणि स्टेडियममध्ये महिलांची उपस्थिती या गोष्टी अफगाणिस्तानात 'इस्लामविरोधी असल्याने तेथे IPL प्रसारित होणार नाही. असे तालिबान सरकारकडून सांगण्यात आले आहे.

आयपीएल 2021 मध्ये अफगाणिस्तानचे आघाडीचे खेळाडू राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान सहभागी होत आहेत. तालिबानने मनोरंजनाच्या बहुतेक प्रकारांवर बंदी घातली आहे. यात अनेक खेळांचा देखील समावेश आहे. यात महिलांना खेळांमध्ये भाग घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी मीडिया मॅनेजर आणि पत्रकार एम इब्राहिम मोहम्मद यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, संभाव्य इस्लामिक विरोधी गोष्टी, मुलींचे नृत्य आदीवर आफगाणिस्तानात बंदी असल्याने आयपीएल प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

SCROLL FOR NEXT