Goa Beach Pollution: 'गोव्यातील समुद्रकिनारे सर्वाधिक प्रदूषित'! NIO च्या अहवालातून चिंताजनक वास्तव समोर..

NIO study Goa Pollution: राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (एनआयओ) यांच्या अलीकडील अभ्यासातून एक अत्यंत चिंताजनक वास्तव समोर आले आहे.
Goa beaches pollution
Goa beaches pollutionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (एनआयओ) यांच्या अलीकडील अभ्यासातून एक अत्यंत चिंताजनक वास्तव समोर आले आहे. गोव्याचे समुद्रकिनारे आता देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी एक बनले आहेत.

मायक्रोप्लास्टिकवर आढळणाऱ्या विषारी पॉलीसायक्लिक अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचे (पीएएच) धोकादायक प्रमाण हा केवळ पर्यावरणीय प्रश्न नसून तो सार्वजनिक आरोग्य, सागरी जैवविविधता आणि गोव्याच्या पर्यटनाधारित अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

Goa beaches pollution
Goa Ecosystem: शेती विकली, डोंगर फोडले अन् संस्कार विसरले! नव्या पिढीच्या चंगळवादामुळे 'आमचा गोवा' परक्यांच्या हाती

पाटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, याहून अधिक चिंताजनक बाब म्हणजे ही एकटी घटना नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) यांनी यापूर्वीच गोव्याच्या किनारपट्टीची धूप होत असल्याचा इशारा दिला होता.

Goa beaches pollution
Goa Politics: खरी कुजबुज; गोवा दूध उत्पादक संघ जीवंत आहे का?

अशा विश्वासार्ह संस्थांकडून सतत धोक्याचे संकेत मिळत असताना, सरकारने तत्काळ आणि ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे. मात्र, भाजप सरकार याबाबत उदासीन आणि निष्क्रिय राहिले आहे. दाबोळी येथे झालेल्या पाणी प्रदूषणाच्या घटनेमुळे सुमारे १४९ नागरिकांना अतिसाराचा त्रास झाल्याची नोंद आहे. हा प्रकार प्रशासनाच्या अपयशाची ठळक जाणीव करून देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com